High Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात या 3 भागांमध्ये होतात वेदना

Surabhi Jayashree Jagdish

अयोग्य आहार

सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त साखर असलेला आहार घेतल्याने LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकते. अशा आहारामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Heart Attack | saam tv

व्यायामाचा अभाव

नियमित शारीरिक हालचाल न केल्यास HDL कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं आणि LDL वाढू शकतं. रोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Cholesterol Symptoms | saam tv

धूम्रपान, मद्यपान आणि आनुवंशिकता

धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि HDL कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढण्याचा धोका असतो. काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी लहान वयापासूनच जास्त असू शकते.

High LDL | saam tv

हार्ट अटॅकचा धोका कसा वाढतो?

LDL कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचल्याने त्या अरुंद आणि कडक होतात. यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि रक्ताची गुठळी तयार झाल्यास हार्ट अटॅकचा झटका येऊ शकतो. म्हणून उच्च कोलेस्ट्रॉल हा हार्ट अटॅकसाठी महत्त्वाचा जोखीम घटक मानला जातो.

Healthy Heart | saam tv

छातीत वेदना

कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास छातीत दडपण, जळजळ किंवा वेदना जाणवू शकतात. हे विशेषतः चालताना, जिने चढताना किंवा श्रम करताना अधिक जाणवू शकते. अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Artery Blockage | saam tv

पायांमध्ये वेदना

पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही चरबी साचल्यास चालताना पोटऱ्यांमध्ये वेदना, गोळे येणं किंवा जडपणा जाणवू शकतो. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ही वेदना कमी होण्याची शक्यता असते.

Chest Pain | saam tv

खांदा, मान किंवा जबड्यात वेदना

हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास वेदना केवळ छातीतच नव्हे तर डावा खांदा, मान, जबडा किंवा हातातही पसरू शकतात. विशेषतः या वेदनांसोबत श्वास लागणं, घाम येणं किंवा मळमळ होत असल्यास ते हार्ट झटक्याचे संकेत असू शकतात.

High Triglycerides | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Heart Attack | saam tv
येथे क्लिक करा