Harley Davidson X440 Saam Tv
लाईफस्टाईल

Harley Davidson X440 ची सर्वात स्वस्त बाईक आली, कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Harley Davidson X440 Delivery Status: Harley Davidson X440 ची सर्वात स्वस्त बाईक आली, कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Satish Kengar

Harley Davidson X440 Delivery Status:

सणासुदीच्या काळात ग्राहकांचा उत्‍साह वाढवण्यासाठी हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वांत मोठी मोटरसायकल व स्कूटर उत्पादक कंपनी हार्ले-डेव्हिडसन X440 या आपल्या पहिल्या को-डेव्हलप्ड प्रीमियम मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करण्यास सज्ज आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२३ रोजी डिलिव्हरी सुरू होणार आहे.

हार्ले-डेव्हिडसन X440 सध्या हिरो मोटोकॉर्प्सच्या गार्डन फॅक्टरी नावाने ओखळल्या जाणाऱ्या कारखान्यात उत्पादित केली जात आहे. भारतातील राजस्थानामधील नीमराणा येथे हा कारखाना आहे. पूर्वआरक्षण केलेल्या ग्राहकांसाठी कंपनीने १ सप्टेंबर २०२३ पासून टेस्ट राइड्स सुरू केल्या आहेत.

नवीन बुकिंग विंडो १६ ऑक्टोबरपासून खुली होत असून, ग्राहक देशभरातील हार्ले-डेव्हिडसनच्या सर्व डीलरशिप्सवर किंवा निवडक हिरो मोटोकॉर्प आउटलेट्समध्ये जाऊन बुकिंग करू शकतात. ग्राहक www.Harley-Davidsonx440.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंगही करू शकतात. (Latest Marathi News)

हार्ले-डेव्हिडसन X440 जुलै २०२३ मध्ये सर्वांसमोर आल्यापासून भारतात खूपच लोकप्रिय झाली. म्हणूनच केवळ महिनाभरात २५००० बुकिंग्ज झाली आहेत. हिरो मोटोकॉर्पने पहिल्या ग्राहकांच्या समूहाला सेवा देण्यासाठी सध्या ऑनलाइन बुकिंग विंडो तात्पुरती बंद केली आहे.

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीत बनवलेल्या या बाइकमध्ये ४४० सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन २७ एचपी पॉवर आणि ३८ एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय या बाईकला ट्रान्समिशनसाठी ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

किती आहे किंमत?

ही मोटरसायकल डेनिम, विविड आणि एस अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, तर तिची किंमत २,३९,५००/- रुपये (डेनिम), २,५९,५००/- रुपये (विविड) आणि २,७९,५००/- रुपये (एस) अशा किंमतींना उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT