प्रत्येकाला आपण स्पेशल असतो असं भासवून देणारा एक दिवस वर्षातून साजरा एकदातरी साजरा केला पाहिजे. विशेषत: गृहीणींसाठी एक दिवस आरामाचा किंवा स्पेशल असायलाच हवा. संपूर्ण कुटुंबाचं आवरुन बाहेरची कामं करुन प्रत्येक गृहीणी तिच्या कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी धडपड करत असते. त्यांच्या आरामासाठी एक दिवस हवाच.
त्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक स्तरावर महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात १९०८ मध्ये अमेरिकेत महिलांनी कामाचे हक्क, समान वेतन आणि मतदानाचा अधिकार यासाठी केलेल्या आंदोलनातून झाली. त्यानंतर १९१० मध्ये क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनीही अधिकृतपणे महिला दिन मान्यता दिली.
समाज, कुटुंब, अर्थव्यवस्था आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे महिलांच्या अधिकार, सन्मान आणि समानतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. पुढे तुमच्या घरातील महिलांसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी आणि इंग्रजीमध्ये या शुभेच्छा दिला आहेत. ज्याचा वापर तुम्ही व्हॉट्सअॅपवर करु शकता.
1. प्रत्येक यशस्वी समाजाच्या मागे एक मजबूत महिला असते,
तुमच्या सामर्थ्याला, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला सलाम!
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
2. स्त्री म्हणजे ममता, शक्ती आणि प्रेरणेचं सुंदर रूप,
तुमचं अस्तित्वच जगाला अधिक सुंदर बनवतं.
महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
3. तिच्या धैर्याला सीमा नाही, तिच्या स्वप्नांना बंधन नाही,
प्रत्येक स्त्रीला तिच्या यशासाठी सलाम!
हॅपी वुमेन्स डे!Happy Womens Day wishes, International Womens Day quotes, Womens Day messages Marathi English, 8 March Womens Day greetings, Women empowerment quotes, Womens Day WhatsApp messages
4. घर, कुटुंब आणि समाजाला आकार देणारी शक्ती म्हणजे स्त्री,
तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करूया.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असते.
त्या शक्तीला सलाम!
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा.
आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी 5 इंग्रजी शुभेच्छा
1.A women performs all the duties of a man but a man cannot do all that a women can do. Happy Womens Day
2. To my friend, who is brave kind and unbreakable Happy Womens Day to you!
3. Happy Womens Day to the woman who fills every moment with warmth and wisdom. Your presence is a blessing!
4. Wishing you a Womens day thats as radiant and extraordinary all your soul. you deserve all the love today and always!
5. To my best friend, you are the definition of fierce, fabulous and fearless! keep shining, keep slaying. Happy Womens Day!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.