Deepika Padukone Beauty Tips Saam tv
लाईफस्टाईल

Deepika Padukone : त्वचेला ग्लोइंग - मुलायम बनवायचे आहे? ब्युटी क्विन दीपिका पदुकोणने शेअर केल्या सिक्रेट्स टीप्स

Birthday girl Deepika Padukone's top beauty secrets : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यांने देखील चाहत्यांना वेड लावले आहे. तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री अपयशी ठरल्या आहेत

कोमल दामुद्रे

Deepika Padukone's Top Beauty Secrets :

आपल्या प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. त्यासाठी आपण त्वचेसाठी अनेक गोष्टींचा वापर करतो. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यांने देखील चाहत्यांना वेड लावले आहे. तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री अपयशी ठरल्या आहेत.

दीपिका पादुकोणचा आज ३८ वा वाढदिवस. मोठ्या पडद्यावरची स्टार दीपिका पादुकोण तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. त्वचा ग्लोइंग आणि मुलायम बनवण्यासाठी खास उपाय करते. जाणून घेऊया तिच्या सौंदर्याचे रहस्य

1. व्यायाम

सुंदर दिसण्यासाठी दीपिका नेहमी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेण्यावर अधिक भर देते. यामुळे तिच्या त्वचेच्या (Skin) आरोग्यावर (Health) सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.

2. स्ट्रेस मॅनेजमेंट

अधिकच्या तणावामुळे त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी मानसिक ताणतणाव (Mental Health) व्यवस्थापित करण्यासाठी ती माइंडफुलनेस तंत्राचा वापर करते.

3. हायड्रेशन

चांगल्या त्वचेसाठी नेहमी हायड्रेट राहाणे महत्त्वाचे आहे. दीपिका तिची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर चमक येते आणि मॉइश्चरायझेशन राहाते. त्यामुळे दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.

4. सनस्क्रीन

सूर्याच्या अतिनिल किरणांपासून वाचण्यासाठी त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरते. अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी आणि सूर्याच्या अतिनिल किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा.

5. थंड पाण्याने चेहरा धुवा

दीपिका तिच्या स्कीन रुटीनमध्ये थंड पाण्याने चेहरा धुण्याला अधिक प्राधान्य देते. ती चेहऱ्यावर बर्फ देखील लावते. ज्यामुळे त्वचा अधिक मुलायम आणि ग्लोइंग होतो.

6. आहार

दीपिका तिच्या आहारामध्ये फळे, भाज्या आणि अँटिऑक्सिडंट्सचा समावेश असलेला आहाराला प्राधान्य देते. तसेच तिखट आणि तेलाचे पदार्थ कमी प्रमाणात खाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT