Hanuman Janmotsav 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Hanuman Janmotsav 2023 : हनुमान जयंती की, जन्मोत्सव ? जाणून घ्या फरक

Hanuman Janmotsav Or Jayanti : पवनपुत्र हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Difference Between Janmotsav And Jayanti : पवनपुत्र हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. याशिवाय कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो. सध्या चैत्र पौर्णिमा 6 एप्रिल 2023 रोजी, गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी बजरंगबलीचे भक्त त्यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करतील.

लोक (People) इंटरनेटवर हनुमान जयंती आणि हनुमान जन्मोत्सव शोधत आहेत. सहसा लोक या दिवसाला हनुमान जयंती म्हणून संबोधतात, परंतु असे म्हणणे चुकीचे आहे. यासाठी योग्य शब्द आहे हनुमान जन्मोत्सव.

जन्मोत्सव आणि जयंती यात मोठा फरक आहे -

जयंती आणि जन्मोत्सव हे शब्द एकच नाहीत. काही लोकांना जयंती आणि जन्मोत्सव या शब्दांमधील फरक माहित नाही आणि ते हनुमानजींच्या प्रकट दिनाला जयंती म्हणत आहेत. असे म्हणणे चुकीचे आहे. यामुळेच हनुमान जयंती म्हणावी की हनुमान जन्मोत्सव म्हणावा असा संभ्रम लोकांमध्ये आहे.

जयंती आणि जन्मोत्सव हे शब्द फक्त वाढदिवस साजरा (Celebrate) करण्याच्या दिवसासाठी आहेत. पण जयंती अशा व्यक्तीसाठी वापरली जाते, जी जगात हयात नाही आणि त्याचा जन्मदिवस त्याच दिवशी साजरा केला जावा. मग ती जयंती म्हटली जाते.

दुसरीकडे, भगवान हनुमान हे कलियुगात जगाचे जिवंत किंवा जागृत देवता मानले गेले आहेत. धर्मग्रंथानुसार, भगवान रामाने भगवान हनुमानाला अमरत्वाचे वरदान दिले होते, तेव्हापासून हनुमानजींनी गंधमादन पर्वतावर आपले निवासस्थान बांधले आणि या ठिकाणी हनुमानजी कलियुगात धर्माचे रक्षक म्हणून निवास करतात. म्हणूनच हनुमानजींच्या जयंती तारखेला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT