Hair Loss Causes Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Loss Causes : तुमचेही केस सतत गळताय? असू शकतात 'ही' पेय जबाबदार !

आपले केस सुंदर दिसले पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते त्यासाठी केसांची काळजी सर्वजण घेत असतात.

कोमल दामुद्रे

Hair Loss Causes : आपले केस सुंदर व लांबलचक दिसावे यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. केसांची निगा राखणे आपल्या प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी आपण नवनवीन आयुर्वेदिक किंवा रसायनिक पदार्थांचा केसांसाठी वापर करत असतो.

आपले केस सुंदर दिसले पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते त्यासाठी केसांची काळजी सर्वजण घेत असतात. केसांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे योग्य म्हणजे नक्की काय तर आपल्या डोक्यात पार्लर, शैम्पू, कंडिशनर आणि हेअर ऑईल येतात

यामध्ये रासायनिक पदार्थचा उपयोग केला जातो. त्यामुळे याचा वापर जास्त प्रमाणात केल्याने आपले केस कमजोर होतात. केसांचा दर्जा अनुवांशिकतेवर अवलंबून असते पण आहाराच्या मदतीने तुम्ही केसांची (Hair) योग्य काळजी (Care) घेऊ शकता.

1. केस कोणत्या पदार्थामुळे गळतात ?

तुम्ही जर योग्य आहार घेतला तर तुम्हाला कोणत्याही केसाच्या समस्या येणार नाही. जनरल न्यूट्रिएंट्स च्या रिपोर्ट नुसार असे काही पेय आहे ज्यामुळे केस गळण्याच्या समस्या होतात. चीनची राजधानी बिंजिगच्या सिंघवा युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे आढळून आले की काही एनर्जी ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्समुळे तीस टक्के पुरुषांचे टक्कल पडले. त्यामुळे तुम्हीही शक्यतो पेय घेणे टाळा.

Hair Loss Causes

2. कोणते पेय घेतल्याने केस गळतात?

एका संशोधनानुसार चहा, कॉफी (Coffee), कोक, एनर्जी ड्रिंक्स, फिजी ड्रिंक्स आणि पेप्सी याचे सेवन केल्याने केस गळण्याच्या समस्या समोर येऊ शकतात.जे पुरुष रोज अशा ड्रिंक्स घेतात किंवा आठवड्यातून १ ते ३ लिटर एवढे ड्रिंक्स घेत असतील तर त्याचा केसगळतीच्या समस्या तीव्र गतीने वाढतात. जे लोक साखरयुक्त (Sugar) सॉफ्ट ड्रिंक्स पितात त्याची केस गळण्याची समस्या ४२% आहे. ज्या पुरुषांनी मान्य केले की, त्याचे केस गळण्याचे कारण हे की, ते आठवड्यात १२ वेळा सॉफ्ट ड्रिंक्स पितात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT