Hair Growth Foods Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Growth Foods : लांब, घनदाट केस हवे आहेत ? आजपासून आहारात 'या' पदार्थांचे सेवन करा

कोमल दामुद्रे

Hair Growth Foods : चेहऱ्याचे सौंदर्य व लांब, घनदाट केस प्रत्येक स्त्रीला हवे असतात. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व प्रदूषणामुळे आरोग्यासोबतच केसांची देखील हानी होत आहे.

बहुतेक महिलांना त्यांचे केस (Hair) लांब, मजबूत हवे असतात. परंतु सध्याच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि त्यांची वाढ मंदावते. आजकाल प्रदूषण, धूळ आणि मातीमुळे केस निरोगी ठेवणे कठीण झाले आहे. तसेच केसांसाठी आपण नवनवीन रासायनिकयुक्त तेलाचा किंवा शॅम्पूचा वापर करतो ज्याचा आपल्या केसांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने तुम्ही केस लांबच नाही तर ते मजबूत देखील करू शकता. (Latest Marathi News)

1. एवोकॅडो

एवोकॅडो हे खूप पौष्टिक फळ आहे, त्याच्या सेवनाने केस मजबूत होतात. या फळामध्ये जीवनसत्त्व ई आढळते, जे केसांचे आरोग्य राखण्यास आणि ते लांब करण्यास मदत करते.

2. गाजर

गाजरात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये जीवनसत्त्व ए विशेषत: आढळते, जे केसांच्या पेशींच्या वाढीस मदत करते आणि केसांना चमकदार बनवते.

3. मासे

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी माशांचे सेवन खूप फायदेशीर आहे.यामध्ये बायोटिन आढळून येते ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते, केसगळती तर दूर होतेच पण केस लांब आणि मजबूत होतात.

4. अंडी

प्रथिने मिळविण्यासाठी आपण अंडी खातो. त्यात बायोटिन, जीवनसत्त्व डी3, जीवनसत्त्व ब आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील असतात, ज्यामुळे केसांच्या वाढीचा वेग वाढतो. खाण्याव्यतिरिक्त केसांना अंडी लावल्यानंतर डोके धुणे देखील फायदेशीर आहे.

5. सुका मेवा

ड्रायफ्रुट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु याद्वारे आपण केस मजबूत करू शकतो आणि ते वाढवू शकतो. तुम्ही बदाम, अक्रोड आणि काजू यांसारखे काजू नियमितपणे खाऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT