Hair Fall Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Falls Issue : केसगळतीमुळे वैतागले आहात? टक्कल पडण्याची भीती वाटते? या ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा

Home Remedies For Hair Falls : खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे केसगळतीची समस्या अनेकांना सतावते. त्यामुळे केस गळणे, केसांची वाढ खुंटणे, केसात कोंडा होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips :

केसगळतीच्या समस्याचा त्रास अनेक महिलांना होतो. बदलते वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे केसगळतीची समस्या अनेकांना सतावते. त्यामुळे केस गळणे, केसांची वाढ खुंटणे, केसात कोंडा होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हल्ली केसगळतीच्या समस्यांवर आपण महागडे केमिकल्स उत्पादनांचा वापर करतो. त्यामुळे केसांची हानी होते. केसांची वाढही खुंटते. परंतु, काही गोष्टींची काळजी (Care) घेतल्यास केस घनदाट होतील तसेच टक्कल पडण्यापासून वाचू शकाल जाणून घेऊया त्याबद्दल

1. हिरव्या भाज्या

आहारात (Food) हिरव्या भाज्याचा नियमितपणे समावेश करा. यामुळे तुमचे केस मजबूत आणि सुंदर होतील. लोहाच्या कमतरतेमुळे केसगळतीची समस्या उद्भवते. यामुळे अनेक आवश्यक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे निरोगी आणि मजबूत केसांसाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करा. आहारात पालक, मेथी, ब्रोकोली आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

2. अंडी

अंडी हा प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. अंडी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. ज्यामुळे केस (Hair) वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे केसगळतीच्या समस्यांचा सामना करता येतो. जर तुम्ही अंडी खात नसाल तर आहारात टोफू, सोयाबीन, चीज आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करा.

3.व्हिटॅमिन सी

केसगळती रोखण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. यामध्ये केसांना आवश्यक असलेले व्हिटॅमीन (Vitamins) सी अधिक असते. त्यासाठी आहारात लिंबू, संत्री, मोसंबी आणि किवी या पदार्थांचा समावेश करा. यामुळे केस आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT