Hair Dye Colors Saam TV
लाईफस्टाईल

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

How to get black hair naturally : मात्र बाहेर मिळणारे डाय विविध केमिकल पासून बनवले जाते. त्याचा आपल्या डोक्याच्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो. डोकं दुखू लागतं. जेव्हढे केस आहेत तेवढे सगळे गळू लागतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या अगदी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील केस पांढरे होण्याच्या समस्या जाणवतात. केस पांढरे झाल्यास आपण वृध्द दिसू लागतो. कमी वयात अगदी तारुण्यात काही मुलींचे केस पूर्णतः पांढरे झालेले दिसतात. पांढरे केस लपविण्यासाठी अनेक मुली त्यांना डाय लावतात.

मात्र बाहेर मिळणारे डाय विविध केमिकलपासून बनवले जाते. त्याचा आपल्या डोक्याच्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो. डोकं दुखू लागतं. जेवढे केस आहेत तेवढे सगळे गळू लागतात. तसेच आपल्याला दृष्टी देखील कमी होते. त्यामुळे आजपासून बाहेरील डाय वापरणे बंद करा.

घरच्याघरी देखील काही रामबाण उपाय करून तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. त्यामुळे आज तोच रामबाण उपाय जाणून घेऊ.

एक नारळ घ्या. नारळ सोलून त्याच्या सालीपासून डाय तयार करा. यासाठी नारळाच्या साली गॅसवर भाजून घ्या. त्यामध्ये थोडा कपूर टाका. हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर चाळणीने चाळून घ्या. पुढे यात थोडं तूप टाकून घ्या. आता हा डाय तुम्ही केसांना लावा. साधारण अर्धा तास केसांमध्ये हा डाय तसाच ठेवा.

अर्धा तास झाल्यावर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आवळ, रिठा आणि शिकाकाई पावडरने केस स्वच्छ धुवून घ्या. केस धुतल्यावर ते लगेचच बांधून ठेवू नका. केस मोकळ्या हवेत चांगले वळवून घ्या. त्यानंतर तुमचे पांढरे केस काळे झालेले दिसतील.

केस पांढरे का होतात?

केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे जास्त टेन्शन घेतल्याने मेंदूवर ताण येतो. त्याने आपले केस पांढरे होतात. लहान मुलांचे केस पांढरे होण्याची कारणे वेगळी आहेत. लहान मुलं योग्य आहार घेत नाहीत. निवडक भाज्या खात नाहीत. त्यामुळे त्यांना हवे ते पोषक तत्व मिळत नाही. परिणामी त्यांचे केस पांढरे होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा तडाखा, नदी-नाल्यांना पूर; रस्ते वाहतूक ठप्प, शेती पाण्याखाली

Maharashtra Live Update: उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT