केसांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक महागडे शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क वापरतो. पण अनेकदा सर्वोत्तम उत्पादने वापरूनही केस गळणे, कोरडे होणे किंवा त्यातला नैसर्गिक चमकदारपणा हरवणे अशा समस्या जाणवतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे केस धुण्याची चुकीची पद्धत. दररोजच्या धावपळीत नकळतपणे होणाऱ्या काही लहान-सहान चुका केसांच्या मुळांना कमकुवत करतात आणि केसांचे मोठे नुकसान घडवून आणतात. तुमचे केस दाट, मऊ आणि निरोगी राहावेत असे वाटत असेल, तर केस धुताना महिलांनी खालील चुका आवर्जून टाळायला हव्यात.
ओले केस कोरड्या केसांपेक्षा जास्त नाजूक असतात. केस धुण्यापूर्वी रुंद दात असलेल्या कंगव्याने केसांचा गुंता काढून घ्या. नाहीतर, केस धुताना केस मोठ्या प्रमाणात तुटतात.
अत् गरम पाण्याचा वापर केल्याने टाळूवरील नैसर्गिक तेल निघून जाते. यामुळे केस निर्जीव होतो आणि कोंडा वाढण्याची शक्यता असते. केस धुताना नेहमी साध्या किंवा कोमट पाण्याचा वापर करावा .
शॅम्पू थेट डोक्यावर एकाच जागी लावल्याने त्या भागातील रसायनांचे प्रमाण वाढते आणि केस कोरडे होतात. शॅम्पू नेहमी तळहातावर घेऊन त्यावर थोडे पाणी मिसळून फेस करा आणि नंतर टाळूला लावा.
शॅम्पू करताना टाळू नखांनी खाजवल्यास जखमा होउ शकतात आणि केसांची मुळे कमकुवत होतोत. नेहमी बोटांच्या टोकांचा वापर करत हलक्या हाताने मसाज करा.
कंडिशनर हे केसांच्या टोकांसाठी आणि लांबीसाठी असते. मुळांना कंडिशनर लावल्याने टाळूची छिद्रे बंद होतात आणि केस तेलकट आणि गळू लागतात. कंडिशनर नेहमी कानाच्या खालील केसांना लावावे.
केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी टॉवेलने जोरात पुसू नका यामुळे केसामना इजा पोहोचते, चमक कमी होते आणि केस तुटतात. टॉवेल एवजी सुती टी - शर्ट किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा.
ओल्या केसांची मुळे अत्यंत संवेदनशील असतात. लगेच कंगवा फिरवल्याने केसांवर ताण येऊ शकतो आणि ते तुटू शकतात. केस किमान 70/80 टक्के हवेने सुकल्यानंतरच हलक्या हाताने विंचरावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.