Hair Care Tips, Benefits Of Curry Leaves Saamtv
लाईफस्टाईल

Hair Care Tips: कढीपत्ता की कडुलिंबाची पाने, केसांच्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

Benefits Of Curry Leaves : कढीपत्ता आणि कडुलिंबाची पाने ही केसांसाठी अधिक फायदेशीर मानली जातात. कढीपत्ता ही जेवणाची चव वाढवते. तर कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायेशीर आहे.

कोमल दामुद्रे

Neem Leaves VS Curry Leaves :

केसांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. केसगळतीची समस्या, केस कोरडे होणे किंवा केसांची वाढ खुंटणे यामुळे जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत.

हल्ली केसांच्या वाढीसाठी अनेक केमिकल प्रोडॅक्टचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांवर त्याचा परिणाम होतो. अनेकदा आयुर्वेदात असे सांगितले जाते की, कढीपत्ता आणि कडुलिंबाची पाने ही केसांसाठी अधिक फायदेशीर (Benefits) मानली जातात. कढीपत्ता ही जेवणाची चव वाढवते. तर कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायेशीर आहे.

अनेकदा प्रश्न पडतो की, कडुलिंबाची पाने की, कढीपत्ता यापैकी केसांच्या वाढीसाठी काय फायदेशीर आहे. जाणून घेऊया केसांच्या आरोग्यासाठी (Health) बेस्ट काय आहे?

कडुलिंबाची पाने फाटे फुटलेल्या केसांसाठी (Hair) फायदेशीर आहे. तर कढीपत्ता अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामध्ये असणारे रॅडिकल्समुळे केसांच्या होणाऱ्या नुकसानामुळे संरक्षण होऊ शकते.

1. केसगळती

कडुनिंबाची पाने टाळूमधील रक्त परिसंचरण सुधारुन केस गळती थांबवण्यास मदत करते. तसेच त्यात असणारे पोषक तत्वे प्रदान करतात. यामुळे केसगळती थांबते.

2. कोंडापासून संरक्षण

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. जे केसांमधील कोंडा घालवण्यास मदत करते. यामुळे टाळूचे आरोग्य राखण्यास मदत होते. कढीपत्ता टाळूचे पोषण करतात. तसेच केसातील कोरडेपणा कमी करतात.

3. केसांची वाढ होते

कडुलिंबाच्या पानांमध्ये केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे गुणधर्म आहेत. कढीपत्ता केसांच्या कूपांना मजबूत होण्यासाठी ओळखले जाते. ज्यामुळे केसांचे आरोग्यासाठी चांगले आहे.

4. केसांचा नैसर्गिक रंग

केसांचा नैसर्गिक रंग राखण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. याशिवाय केस अकाली पांढरे होण्यापासून प्रतिबंध करण्यास मदत करते. कडुलिंबाची पाने केसांना निरोगी बनवण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

SCROLL FOR NEXT