Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : सतत गळणाऱ्या केसांसाठी फायदेशीर ठरेल 'हा' ज्यूस, डोक्यातील कोंड्याची चिंता आता नको !

केस गळतीची समस्या रोखण्यासाठी या रसाचे सेवन करा

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व प्रदूषण यामुळे आरोग्यासोबतच आपल्या इतर अनेक गोष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. त्वचेसोबतच केसांच्या आरोग्याच्या समस्येचे दिवसेंदिवस प्रमाण वाढले आहे.

आजकालच्या फास्ट फॉरवर्ड लाइफमध्ये केसांची खूप काळजी करतात. केस गळती रोखण्यासाठी लोक महागड्या केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करत असतात, पण त्यानंतरही केसगळती कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या जीवनशैली आणि आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

केस मजबूत करण्यासाठी या रसांचा आहारात समावेश करा. त्यांचे सेवन केल्याने केस गळणे थांबते. चला तुम्हाला सांगतो की निरोगी केसांसाठी तुम्ही कोणत्या फळांच्या रसांचा आहारात समावेश करावा.

१. गाजरात जीवनसत्त्व ए आणि ई आढळते, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजराचा रस केसांची वाढ वाढवण्यास मदत करतो. यासोबतच याच्या रसामुळे केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. त्यामुळे जर तुम्हाला दाट लांब केस घ्यायचे असतील तर तुमच्या आहारात एक ग्लास गाजराचा रस अवश्य समाविष्ट करा.

२. किवी हे फळ जेवढे खायला स्वादिष्ट आहे तेवढेच आपल्या केसांसाठीही फायदेशीर आहे. किवीच्या रसात जीवनसत्त्व (Vitamins) ई भरपूर असते. जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहे. याचे रोज सेवन केल्याने केस गळण्याची समस्या टाळता येते. दुसरीकडे, जर तुम्ही किवीचा लगदा तुमच्या टाळूवर लावू शकता, तर असे केल्याने केसांची वाढ चांगली होईल.

३. कोरफडीच्या रसामध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात जी केस मजबूत करण्याचे काम करतात. त्याच वेळी, याचे सेवन केल्याने केस तुटणे देखील थांबते. जर तुम्हाला कोंडा किंवा खाज येण्याच्या समस्येने त्रास होत असेल तर तुम्ही कोरफडीचा रस पिऊ शकता. याशिवाय केसांना चमकदार बनवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर थेट केसांना (Hair) लावू शकता.

४. सलादच्या रुपात खाल्ली जाणारी काकडी केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. केसगळती रोखण्यासाठी काकडीचा रस खूप प्रभावी आहे. हे केस मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी ओळखले जाते. वजन कमी करणे, मजबूत हृदय आणि चांगले रक्ताभिसरण यासाठी देखील त्याचा रस फायदेशीर आहे. रोज फक्त १ ग्लास काकडीचा रस प्यायल्याने केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT