Gudi Padwa 2026 Date google
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Gudi Padwa 2026 in Maharashtra: यंदा गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. जाणून घ्या प्रतिपदा तिथी, गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त, अभिजित आणि लाभ मुहूर्त तसेच पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा कसा साजरा केला जातो.

Sakshi Sunil Jadhav

गुढीपाडवा हा सगळ्याच भारतीयांचा आवडीचा सण आहे. हा दिवस महाराष्ट्रात नव्यावर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. तिची सहकुटुंबाने पूजा केली जाते. मुळात ती गुढी उत्तम प्रकारे सजवली जाते. या दिवशी संपूर्ण कुटुंब छान नटून थटून हा सण साजरा करतात. घरासमोर लांबच्या लांब रांगोळ्या काढतात. गोडाचा पदार्थ करतात. अशी महाराष्ट्रातली परंपरा आहे. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. पुढे आपण याचे योग्य मुहूर्त, तारिख, वेळ, लाभ अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत.

यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होणार आहे. ही तिथी २० मार्च २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहणार आहे. उदय तिथीनुसार १९ मार्च २०२६ रोजीच गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाईल.

हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ४४ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून १४ मिनिटांपर्यंत आहे. तसेच अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. लाभ मुहूर्त दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील.

मृत मुहूर्त दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असणार आहे. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त १९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? पारंपारिक पद्धत काय?

गुढीपाडव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. या दिवशी लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि घराच्या दारासमोर गुढी उभारतात. गुढी तयार करताना काठीवर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवला जातो आणि त्याखाली लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते. त्यासोबत फुलांच्या माळा, आंब्याची पाने, साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची पाने बांधून गुढी सजवली जाते.

घरासमोर फुलांची तोरणं लावली जातात आणि सुंदर सुंबक रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेर उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. तसेच ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवते, अशी श्रद्धा आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे अनेकजण या दिवशी नवीन घर खरेदी करणं, वाहन खरेदी करणं किंवा नव्या व्यवसायाची सुरुवात करणं शुभ मानतात. त्यामुळे हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

SCROLL FOR NEXT