Guava Side Effects google
लाईफस्टाईल

Guava Side Effects: पेरू खाणं या ४ 'रिस्की' गटातल्या लोकांसाठी ठरतंय घातक, कारणे काय?

Summer Fruits: पेरू पौष्टिक असला तरी काही लोकांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. डायबेटीस, अॅलर्जी आणि पचन समस्यांमध्ये त्याचे दुष्परिणाम वाढू शकतात, त्यामुळे योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक सेवन करणे आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळा आला की, लोक वेगवेगळी फळं विकत घेऊन खातात. या दिवसांमध्ये आंबा, कैरी, कलिंगड, डाळिंब, केली आणि पेरू यांसारखी अनेक फळं बाजारात उपलब्ध असतात. पण सगळीच फळं सगळ्यांनीच खाणं योग्य नसतं. कारण प्रत्येक फळाचे फायदे वेगवेगळे असतात. त्यातच डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी पेरू खाणं टाळलं पाहिजे. कारण त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पण तो तुम्हाला फारसा जाणवत नाही. तुम्हाला जर याच धोक्यापासून वाचायचं असेल तर पुढील माहिती शेवटपर्यंत वाचा.

पेरु खायला सगळ्यांनाच आवडतात. त्यामध्ये व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. काही लोकांना पेरू इतका आवडतो की, ते रोजच्या रोज खातात. त्याने पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमच्या स्कीनलाही फायदा होतो. पण प्रत्येक पदार्थ प्रत्येकाच्या शरीराला सूट होतोच असं नाही, आणि इथेच काळजी घेण्याची गरज आहे. पेरूमधल्या जास्त फायबरमुळे पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी किंवा सूज वाढू शकते. पेरूच्या बियांमुळे आतड्यांवर ताण सुद्धा येतो.

पेरू कितीही आवडीचा असला तरी डायबेटीजच्या रुग्णांनी तो जरा सांभाळूनच म्हणजे कधीतरी आणि कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे. कारण त्यातली नैसर्गिक साखर तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामध्ये पिकलेला पेरू किंवा पेरूचा ज्यूस घेतल्यावर हा धोका जास्त असतो. त्यामुळे प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खाणं योग्य ठरेल.

तसेच त्वचेच्या अॅलर्जी किंवा एक्झिमा असलेल्यांनी पेरू खाणं शक्यतो टाळावं. कारण त्याने त्वचेवरची खाज, पुरळ किंवा त्वचेवर लालसरपणा येतो. पेरूमुळे सारखी सर्दी, खोकला किंवा सायनसचा त्रास होतो. लहान मुलांनी जर जास्त पेरू खाल्ला तर कफ वाढू शकतो आणि घशात खवखव सुद्धा वाढतो. त्यामुळे तो रात्री खाणं सुद्धा टाळलं पाहिजे. जर तुम्हाला पेरू खाऊन पोटदुखी, सूज, खाज किंवा इतर त्रास जाणवत असेल, तर ते शरीराचे संकेत आहेत. अशावेळी पेरू खाणं कमी करा किंवा पूर्णपणे बंदच करा.

टीप: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोणताही आहार अंधाधुंद पद्धतीने न पाळता आपल्या प्रकृतीनुसार निवडणं गरजेचं आहे. योग्य आहार, संतुलन आणि सजगपणे खाण्याच्या सवयी यामुळेच दीर्घकाळ निरोगी राहता येतं. तसेच रुग्णांनी आहारात बदल करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारात विकणारी केळी नैसर्गिक आहेत की केमिकल, कशी ओळखाल?

Nora Fatehi : नोरा फतेही अन् संजय दत्तच्या अश्लील गाण्यावर बंदी घालण्याची मागणी; तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Crime: नवऱ्याचं भयंकर कृत्य; बायकोला मित्रांकडे सोपवलं; विवाहित महिलेवर चौघांकडून सामूहिक बलात्कार

Maharashtra Live News Update : फळांचा राजा रुसला! पाडवा निमित्त आंब्याची आवक कमी, भाव वाढले

Crime News : लग्नानंतर बॉयफ्रेंडकडून छळ, तरुणीने नवऱ्याच्या मदतीने काढला काटा; दगड अन् चाकूने हल्ला करत संपवलं

SCROLL FOR NEXT