guava helps improve skin and boost immunity Freepik
लाईफस्टाईल

Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

Guava Helps Improve Skin And Boost Immunity : प्रत्येक महिलेने आपल्या आहारात पेरूचा समावेश जरूर करावा. यामुळे त्वचा चमकदार होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निसर्गाने अशी अनेक फळे आपल्याला वरदान म्हणून दिली आहेत. जी मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणाप्रमाणे शरिरासाठी गरजेची असलेली विविध फळे येत असतात. त्यातीलच एक फळ म्हणजे पेरू. पेरू साधारणतः वर्षभर उपलब्ध असतो. पण वसंत ऋतूत बाजारात अधिक प्रमाणात पहायला मिळतो. पेरू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेषतः महिलांसाठी हे फळ अधिक फायदेशीर ठरते.

पुरूषांच्या तुलनेत महिलांना अधिक पोषण आणि मजबूत रोगप्रतिकारशक्तीची गरज भासते. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात शिवाय पचन सुधारतात, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवतात आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. विशेष म्हणजे हे फळ गर्भवती महिलांसाठीही उपयुक्त ठरते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी, ई, के सोबतच मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम यांसारखे अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले व्हिटॅमिन सी असतेच त्याचसोबत असलेले अँटीऑक्सिडंट्स, मुख्यातः लाइकोपीन त्वचेला घातक सूर्यकिरणांपासून वाचवते. यामुळे त्वचेला येणारे अकाली वृद्धत्व रोखता येते. पेरू खाल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते, वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

तुम्ही अनेक प्रकारे पेरूचे सेवन करू शकता:

१. पेरूच्या गराची स्मूदी बनवा.

२. परूचे लहान तुकडे करून सॅलेडमध्ये घालून खाऊ शकता.

३. पेरूच्या पानांचा चहा करू शकता.

४. पेरूचे गोल काप किंवा बारिक तुकडे करून चाट बनवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT