Green Chili  yandex
लाईफस्टाईल

Green Chili: हिरवी मिरची खाणे आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Green Chili Health Benefits: हिरवी मिरची जेवणाची चव वाढवण्यासह आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक भारतीय घरात हिरव्या मिरच्यांशिवाय जेवण बनू शकत नाही. केवळ जेवणातचही नाही, तर काही लोकांना ते जेवणासोबतही खायला आवडते. हिरवी मिरची केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यात पोटॅशियम, आयरन, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. जे निरोगी आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. हिरवी मिरची खाल्ल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या.

पोषक तत्वांनी समृद्ध

हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात. जे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. तर व्हिटॅमिन सी पेशींचे नुकसान कमी करते. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीनसारखे घटक आढळतात. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय, ते सर्दी, खोकला सारख्या रोगांशी लढण्यास मदत करतात.

पचनाची गती वाढते

दररोज एक हिरवी मिरची खाल्ल्याने पचनाची गती वाढू शकते. हिरव्या मिरच्यांमध्ये कॅप्सेसिन असते जे पचनसंस्था सुधारण्याचे काम करते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हिरवी मिरची नक्कीच खा. कारण हिरवी मिरची कॅलरीज लवकर बर्न करण्यास मदत करते. आणि शरीराचे तापमान सामान्य ठेवते.

त्वचेसाठी फायदेशीर

हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. मिरचीचे सेवन केल्याने त्वचेवर चमक येते. सुरकुत्याही कमी होतात.

हृदय निरोगी ठेवते

हिरव्या मिरच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

आहारात हिरव्या मिरचीचा कसा समावेश करावा

हिरवी मिरची कच्ची किंवा शिजवून खाऊ शकता. मिरचीचा सॅलडमध्ये, भाज्यांमध्ये किंवा लोणच्यामध्ये वापर करु शकता. पण हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. मिहणून मिरची कमी प्रमाणात खावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT