World TB Day 2025: खोकला जात नाहीये, वेळीच व्हा सावध; असू शकतं टीबी, अशी घ्या काळजी

Symptoms Of TB How to Take Care: टीबी सारख्या धोकादायक आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. क्षयरोग म्हणजेच टीबी हा फुफ्फुसांचा एक गंभीर आजार आहे ज्यावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे.
World Tb Day
World Tb Daygoogle
Published On

टीबीविरुद्धच्या लढाईला मजबूत करण्याासाठी आणि लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च रोजी 'जागतिक क्षयरोग दिन' (World TB Day 2025) साजरा केला जातो. टीबी हा फुफ्फुसांचा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. म्हणूनच वेळेवर टीबीला ओळखणे आणि त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. परंतु टीबीची सुरुवातीची लक्षणे कोणती जाणून घ्या.

टीबी म्हणजे काय? Tuberculosis

टीबी (Tuberculosis) हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु तो शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करू शकतो. टीबी ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्याचे वेळेवर निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे.

टीबीचे लक्षणं कोणती?

टीबीचे लक्षण व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर आणि रोगाच्या टप्प्यावर अवलंबून असतात. काही प्रकरणांमध्ये, टीबीचे जीवाणू शरीरात निष्क्रिय राहू शकतात आणि कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. याला लेटेंट टीबी म्हणतात. परंतु जेव्हा आजार सक्रिय असतो, तेव्हा याची लक्षणे दिसू शकतात.

World Tb Day
Harbhajan Singh: जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी; हरभजन सिंग वादात सापडला, आयपीएलमधून बॅन करण्याची मागणी

टीबीचे सुरुवातीची लक्षणं कोणती?

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येणे जो हळूहळू वाढत जातो हे टीबीचे एक प्रमुख लक्षण आहे. खोकल्यासोबत रक्त देखील येऊ शकते.

टीबी असलेल्या व्यक्तीला सौम्य ताप आणि रात्री घाम येऊ शकतो.

कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी होणे हे देखील क्षयरोगाचे लक्षण असू शकते.

टीबी रुग्णांना अधिक थकवा आणि अशक्तपणा जाणवतो .

श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे हे देखील टीबीचे लक्षण असू शकते.

टीबी ग्रस्त व्यक्तीला भूक कमी लागते, ज्यामुळे शरीर कमकुवत होते.

फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टीबी रोखण्यासाठी अशी घ्या काळजी

टीबीचे जीवाणू हवेतून पसरतात, म्हणून खोकताना किंवा शिंकताना तोंडवर रुमाल ठेवा. तसेच, नियमितपणे हात धुवा.

जर एखाद्या व्यक्तीला टीबी असेल तर तुम्ही त्याच्याशी जास्त संपर्क टाळावा. बाधित व्यक्तीने मास्क घालावे, जेणेकरून बॅक्टेरिया इतरांमध्ये पसरणार नाहीत.

निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते.

धूम्रपान आणि मद्यपान फुफ्फुसांना कमकुवत करते आणि टीबी धोका वाढवते.

जर तुम्हाला टीबीची लक्षणे दिसली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेवर निदान आणि उपचार करून टीबीचा प्रसार रोखता येतो.

जर एखाद्या व्यक्तीला टीबी झाला असेल तर त्याने नियमितपणे आणि पूर्ण कालावधीसाठी औषधे घेतली पाहिजेत.

World Tb Day
Irfan Pathan: खेळाडूंशी पंगा घेणं इरफान पठानला महागात पडलं; आयपीएल कॉमेंट्री पॅनलमधून थेट बाहेर काढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com