Health Tips: आहारात साखरेऐवजी करा गुळाचा वापर, होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Replace Healthy Food in Diet for Healthy Life: निरोगी आरोग्यासाठी निरोगी आहार तितकाच महत्वाचा आहे. यासाठी खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये योग्य बदल केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
Health tips
Health tipsfreepik
Published On

चांगले आरोग्य राखण्यासाठी, खाण्याच्या सवयी सुधारणे खूप महत्वाचे आहे. आपण जे काही खातो त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. आजारांपासून बचाव करण्यासाठी, प्रत्येकाने लहानपणापासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही रिसर्चमधून असे दिसून आले की, जास्त प्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांना बळी पडू शकता, म्हणून जर निरोगी राहायचे असेल तर सर्वप्रथम साखरे आणि मीठाचे सेवन कमी करा. रिफाइंड साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेह, हृदय आणि मानसिक आरोग्याची समस्या तसेच कर्करोग होण्याची शक्यता असते.

साखरऐवजी गूळ खाण्याची सवय लावा

न्यूट्रिशनिस्टच्या मते, चहामध्ये साखरेऐवजी गुळ वापरायला सुरुवात करा. साखरेपेक्षा गुळ हा एक चांगला पर्याय आहे, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित समस्या असतील तर गूळ एक चांगला पर्याय आहे. साखरेच्या तुलनेत, गुळामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. काही रिसर्चमधून असे दिसून आले की, साखरेचे सेवन कमी करून त्याऐवजी गुळाचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात

साखरेला गुळ हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. मधुमेह असलेले लोक साखरेऐवजी चहामध्ये गुळ मिसळून ते कमी प्रमाणात चहा पिऊ शकतात. गुळामध्ये फायबर, लोह आणि फॉलिक अॅसिडसारखे अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराला नियमितपणे आवश्यक असतात. जर तुमच्या साखरेची पातळी जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गुळ खाऊ नका.

Health tips
Privacy Tips: आयुष्याशी संबंधित 'या' गोष्टी कधीही शेअर करू नका, अन्यथा होईल पश्चात्ताप

हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर

साखरेचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने शरीरात इन्फ्लेमेशनचा त्रास वाढतो. यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.गुळामध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे संतुलित प्रमाण असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.

साखरेऐवजी गूळ खाण्याचे आणखी फायदे

गुळामध्ये फायबर असते. यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठते सारख्या समस्या कमी होण्यास मदत करतात.

गुळामध्ये आयरन आणि मिनरल्स असतात. जे रत्क शुद्ध आणि विषारी पदार्थांना शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात.

गुळामध्ये असलेले गुळामध्ये असलेले कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

गुळ खाल्ल्याने यकृत डिटॉक्सिफाय होण्यासाठी फायदेशीर ठरते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health tips
Cucumber: उन्हाळ्यात काकडी खाणं ठरत फायदेशीर, जाणून घ्या मोठे फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com