eye drop saam tv
लाईफस्टाईल

डोळ्यांचा चष्मा घालवणाऱ्या 'त्या' Eye Drop ला सरकारचा दणका; 'या' कारणाने आणली बंदी!

डोळ्यांवरील चष्मा काढण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपवर बाजारात येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. या ड्रॉपच्या रोजच्या वापराने डोळ्यांचा चष्मा दूर होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

काही दिवसांपूर्वी अवघ्या काही मिनिटांत चष्मा दूर करून दृष्टी सुधारण्याचं एक आय ड्रॉप बाजारात येणार असल्याची चर्चा होती. मात्र डोळ्यांवरील चष्मा काढण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपवर बाजारात येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या औषध नियामक संस्थेने प्रेस्वू आय ड्रॉपला मान्यता दिली होती. मात्र आता परंतु आता CDSCO ने पुढील सूचना मिळेपर्यंत या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने पायलोकार्पिन वापरून बनवलेले प्रेस्वू आय ड्रॉप्स लाँच केलं होतं. यावेळी कंपनीकडून मायोपिया आणि हायपरमेट्रोपियाच्या उपचारांसाठी आय ड्रॉप तयार केल्याचा दावा करण्यात आला होता. या ड्रॉपच्या रोजच्या वापराने डोळ्यांचा चष्मा दूर होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं होतं.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन (CDSCO) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट समितीने या आय ड्रॉपची शिफारस केल्यानंतर ENTOD फार्मास्युटिकल्सला भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (DCGI) कडून मंजुरी मिळाली होती. परंतु यानंतर आता औषध कंपनीने या आय ड्रॉपने केलेल्या जाहीरातीचा गांभीर्याने विचार केला. यानंतर पुढील आदेशापर्यंत परवानगी स्थगित करण्यात आली आहे.

का आणली या आय ड्रॉपवर बंदी?

अवघ्या १५ मिनिटांत तुमचा चष्मा दूर होईल अशा आशयाची जाहिरात या आय ड्रॉपद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे चष्मा असलेले अनेकजण या जाहिरातीमुळे भारावले गेले. परिणामी या औषधाचा असुरक्षित वापर आणि सुरक्षेची काळजी यामुळे औषध नियामक संस्थेवर यासंबंधीची चिंता वाढली. डॉक्टरांच्या सल्लानेच हे आय ड्रॉप मिळणार होतं, मात्र याच्या जाहिरातीनुसार, कोणीही याचा वापर करू शकतं, असं दिसून आलं.

१५ मिनिटांत चष्मा होणार गायब- दावा

या आय ड्रॉपमुळे कॉन्टॅक्ट लेन्स आणि शस्त्रक्रियेची गरज नाही, असा दावा करण्यात आला होता. हा आय ड्रॉप डोळ्यात टाकल्यास चष्म्यापासून सुटका देणार आणि ड्रॉप डोळ्यात टाकल्यास बाहुलीचा आकार कमी करून अडथळा दूर होणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय एक थेंब डोळ्यात टाकल्यास 15 मिनिटांत निकट दृष्टीदोष दूर होऊ शकतो, असंही म्हटलं गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT