Google Search 2022
Google Search 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Google Search 2022 : अग्निपथ योजनेविषयीच्या त्या एका प्रश्नाने 2022 मध्ये गुगलही झालं चकित, जाणून घ्या नेमके काय?

कोमल दामुद्रे

Google Search 2022 : वर्षे अखेरीस गुगल साइट्सवर वर्षभरात काय घडले जाते हे आपल्याला कळते. यामध्ये काही चांगल्या घटना असतात तर काही वाईट देखील. अशीच एक गोष्ट गुगल रँकमध्ये दिसून आली ज्यामुळे देशभरात खळबळ माजली.

गुगलने सर्च 2022 ची घोषणा केली आहे. टेक कंपनीच्या 'व्हॉट इज' श्रेणी अंतर्गत 2022 मध्ये 'अग्निपथ योजना काय आहे' सर्वात जास्त शोधली गेली. या प्रश्नाने गुगलवर सर्वाधिक खळबळ माजली, कारण लोकांना 'अग्निपथ योजना' म्हणजे काय हे जाणून घेण्यात अधिक रस होता. केंद्र सरकारच्या सैन्यात भरतीसाठीच्या योजनेने गुगलच्या टॉप सर्चमध्ये पहिले स्थान मिळवले.

9 श्रेणींमध्ये गुगलने वर्षभरात अधिक काय शोधले याचा सर्वे केला तर या ९ सर्च लिस्टमध्ये what is, how to, movies, near me, sports events, people, news events आणि Recipe यांचा समावेश आहे. तसेच अग्निपथ योजनेबद्दल अनेकांनी माहिती करुन घेण्याचा प्रयत्न केला.

केंद्र सरकारची अग्निपथ योजना जूनमध्ये सुरू करण्यात आली होती, म्हणजेच गेल्या सहा महिन्यांतच तिला देशभरातून अव्वल स्थान मिळाले. तर, 'काय आहे' कॅटेगरीत, What is NATO हे दुसऱ्या, What is NFT तिसऱ्या, What is PFI चौथ्या आणि What is the square root of 4 हे पाचव्या स्थानावर आहे.

काय आहे अग्निपथ योजना?

केंद्र सरकारने (Government) आणलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलात भरती केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून ओळखले जाते. त्यांना चार वर्षांच्या सेवेसाठी सैन्यात भरती केले जाते. त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सेवेसाठी पात्र मानले जातात.

योजनेनुसार, सेवेत सामील होणारे 25 टक्के अग्निवीर कायमस्वरूपी केडर म्हणून सशस्त्र दलात सामील होतात. चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या तरुणांना पेन्शन दिली जाणार नाही. परंतु त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सुमारे 12 लाख रुपये दिले जातील. अनेक राज्यांनी या अग्निवीरांना त्यांच्या भरतीत आरक्षण देण्याची घोषणाही केली आहे.

इतर कोणत्या रिसर्चला महत्त्वाचे स्थान मिळाले?

भारतीय (India) लोकांनी वर्षभरात इंडियन प्रीमियर लीगचा सर्वाधिक शोध घेतला. लसीकरण प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करायचे याला देखील अधिक वेळा शोधले गेले. लता मंगेशकर यांचा मृत्यू, सिद्धू मुसेवाला, रशिया-युक्रेन युद्ध, यूपी निवडणूक निकाल आणि भारतातील कोविड-19 प्रकरणे हे भारतातील सर्वाधिक शोधले जाणारे यंदाचे विषय ठरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tur Dal Rate Update: तुरडाळ महागली! जाणून घ्या नवे दर

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

Today's Marathi News Live: माढ्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तीन सभा

Sharman Joshi Birthday : शर्मन जोशीला ‘इडियट’ नाव कसं मिळालं?; अभिनेत्याच्या करियरला ‘या’ चित्रपटांमुळे मिळाली कलाटणी!

Hair Care Tips: Dry Hair च्या समस्येने हैराण? घरगुती तूपाच्या मदतीने दूर करा समस्या…

SCROLL FOR NEXT