Google Flight Ticket Saam Tv
लाईफस्टाईल

Google Flight Ticket : स्वस्तात मस्त फ्लाइटने प्रवास करायचाय? गुगल करणार मदत; कशी कराल बुकिंग, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Google Launch Google Flight App : गुगलने स्वस्त फ्लाइट तिकिटांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे.

कोमल दामुद्रे

Google Flight App :

वीकेंडला किंवा तुम्ही येत्या सुट्टीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बरेचदा प्रवास करण्यापूर्वी आपण बजेट फ्रेंडली तिकीट बुक करण्याचा विचार करतो. परंतु, कधी तिकीटच उपलब्ध नसते तर कधीच फ्लाइट मिळत नाही त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होतो.

परंतु, गुगलने स्वस्त फ्लाइट तिकिट खरेदी करण्यासाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. कंपनीने अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे या नवीन फीचरची माहिती दिली आहे. ज्यामुळे बुकिंगवर पैसे वाचवायचे असतील, तर हे फीचर तुमच्या कामी येईल. तसेच फ्लाइट बुक करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे देखील कळणार आहे. सध्या या नव्या फीचरची चाचणी सुरु आहे. ज्याच्या लवकरच प्रवाशांना लाभ होणार आहे.

1. कशी असेल सुविधा?

कंपनी (Company) या फीचरमध्ये रिलायबल ट्रेंड आणि डेटायामध्ये जोडत आहे. याच्या मदतीने प्रवाशांनी निवडलेल्या तारखेसाठी आणि ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्याची तिकीट कमी किमतीत मिळतील. तसेच गुगलचे हे फीचर (Feature) प्रवाशांना फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी सर्वात योग्य असेल.

2. या अॅपचा वापर कधी करता येईल?

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे सांगितले की, या आठवड्यात आम्ही इनसाइट्स लाँच करत आहोत, जेणेकरून तुम्हाला निवड करणे सोपे होईल. तसेच ट्रेंड डेटाच्या मदतीने शोधल्यास तुम्हाला तिकीटाचे पैसे किती कमी झाले आहे हे देखील कळेल.

3. नवीन वैशिष्ट्य कसे असेल?

जर तुम्ही Google Flights मध्ये किंमत ट्रॅकिंग सिस्टम चालू केली. तर तुम्हाला गुगल फ्लाइटच्या तिकीटाच्या दरांची किंमत कळेल. Google Flights च्या मदतीने तुम्ही हव्या त्यावेळी ही ट्रॅकिंग सिस्टम सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला गुगलमध्ये साइन इन करावे लागेल.

4. टेक ऑफ होईपर्यंत किमत पाहा

Google Flight मध्ये फ्लाइटनुसार तुम्हाला किमत दिसेल. याची किमत फ्लाइट टेक ऑफ होईपर्यंत कमी जास्त होऊ शकते. जर यामध्ये फ्लाइटच्या तिकीटाचा दर कमी झाल्यास तुम्हाला गुगल पेद्वारे परत मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT