Natural acne remedy saam tv
लाईफस्टाईल

Natural acne remedy: फक्त ५ रूपयात होणार पिंपल्सपासून सुटका; घरच्या घरी वापरा ही सोपी ट्रिक

Natural acne remedy: आपली त्वचा फ्रेश आणि सॉफ्ट राहावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अनेकदा पिंपल किंवा त्वचेच्या समस्यांमुळे तुमचा लूक खराब होतो. चमकदार आणि स्वच्छ त्वचा प्रत्येकाला आवडते. पिंपल्स आणि त्यांचे डाग चेहऱ्याचं सौंदर्य कमी करतात.

Surabhi Jayashree Jagdish

अयोग्य आहार, चुकीची जीवनशैली आणि हार्मोनल बदल यामुळे अनेकांना पिंपल्सच्या समस्या जाणवतात. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, पण तरीही चेहऱ्यावर अपेक्षित परिणाम दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.

घरगुती उपाय

चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय करता येतात. भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळणारा डिंक हा असा पदार्थ आहे, जो पिंपल्सपासून आराम मिळवण्यास मदत करू शकतो. त्याचा वापर कसा केला पाहिजे ते पाहूयात.

डिंकाचे फायदे

डिंक हे थंड असतं. यात नैसर्गिक थंडावा असल्यामुळे त्वचेला आराम मिळतो मिळते. तसंच यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्मही आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. रोज डिंकांचं थोड्या प्रमाणात सेवन केल्याने शरीर आतून डिटॉक्स होतं आणि त्यामुळे पिंपल्स, सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

सेवन कसं करावं?

सर्वप्रथम डिंक रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थंड पाण्यात घालून त्यात अर्धा लिंबू पिळा. त्यानंतर हे मिश्रण नीट ढवळून घ्या. सलग ३ ते ४ दिवस याचं सेवन केल्यास त्वचेवर चांगले बदल दिसू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT