Gold and silver Price Saam Tv
लाईफस्टाईल

Gold Silver Price Today : सोने पुन्हा महागलं, तर चांदी झाली स्वस्त; पाहा आजचा भाव

आज सोन्याचा दर 51849 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी (Gold Price) दरात चढ-उतार होत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून येत आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या (Silver Price) दरात तब्बल 1100 रुपयांनी वाढ झाली होती. आज म्हणजे शनिवारी सुद्धा सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (Gold Silver Latest Price Today)

आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने (Gold Price Today) 968 रुपयांनी महागले असून ते प्रति 10 ग्रॅम 51849 रुपयांवर पोहोचले आहे. एकीकडे सोन्याचे दर वाढले असले, तरी चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो 403 रुपयांनी घसरून 58 हजार 400 इतका झाला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स

असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 51849 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50863 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी, सोन्याचे दर त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,351 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. (Gold-Silver Price Hike Today)

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT