Beauty Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Beauty Tips : सौंदर्याचे तेज टिकवण्यासाठी पार्लरमध्ये जाताय ? जाणुन घ्या, बॉलीवूड अभिनेत्रींच्या काही खास टिप्स

पार्लर मध्ये न जाता घरच्या घरीच साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील समस्या दूर करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beauty Tips : दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचा प्रभाव आपल्या त्वचेवर पडतो. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं असतं की, मी सुध्दा एका बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रीसारखीच दीलसी पाहिजे. अशी अपेक्षा करनं अजिबातच चुकीचं नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? बॉलीवूड अभिनेत्री (Actress) सुंदर दिसण्यासाठी मेकअप नाही तर घरगुती (Home) ब्युटी टिप्सचा वापरत करतात.

प्रदूषणामुळे त्वचा (Skin) खराब तर होतेच पण त्याचबरोबर त्वचा हळू हळू निस्तेज दिसू लागते. उन्हाळ्यात त्वचा खुपचं काळी पडते तर पावसाळ्यात त्वचा चीपचीपित होते आणि थंडीच्या दिवसांत तर त्वचा खुपचं कोरडी पडते.

प्रत्येक महिलेला असं वाटतं की तीच्या त्वचेवर कोणताच प्रकरचा प्रॉब्लेम नसावा. आणि त्वचा नेहमीचं कोमल आणि मुलायम राहावी. पण वाढत्या प्रदूषणाचा प्रभाव आपल्या त्वचेवर होत असतो. पुरळ येणे, त्वचा निस्तेज दिसणे, लाल चट्टे पडणे आणि काळे डाग येणे या समस्या दिसू लागतात.

दिवसेंदिवस आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो जणू काही नाहीसा होत चालला आहे. पार्लर मध्ये न जाता घरच्या घरीच साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील समस्या दूर करू शकता. अशा प्रकारच्या समस्यांपासून दुर राहण्यासाठी आम्ही तुम्हाला बॉलीवुड हीरोइनिंनच्या काही खास ब्युटी टिप्स सांगणार आहोत.

1. ऐश्वर्या राय ब्युटी टिप्स -

ऐश्वर्या राय हिच मनमोहक सौंदर्य सर्वांनाच माहित आहे. तीने आतापर्यंत तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. परंतू तिच्या या सौंदर्याचे कारण म्हणजे घरागुरी सौंदर्य प्रसाधन सामग्री. हो तुम्ही बरोबर वाचलत.

ऐश्वर्या रायने एका इंटरव्यू मध्ये असं सांगितलं होतं की, "मी माझ्या केसांना घनदाट आणि मजबूत करण्यासाठी एवोकाडोचा वापर करते". त्याचबोबरी ऐश्वर्या राय ही आपल्या चेहऱ्याला केळी आणि दही यांचं मिश्रण करून फेस पॅक सारखं लावते. या घरगुती फेस पॅक मुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

2. आलिया भट ब्युटी टिप -

आलिया भट सारखी चकाकणारी कांती प्रतेक मुलीला हवी असते. बॉलीवूड मध्ये सर्वात चांगली त्वचा असलेली अभिनेत्री म्हणून आलिया भटला ओळखले जाते. आलिया सारखी स्किन हवी असेल तर तुम्हाला दररोज तुमच्या चेहऱ्यावर बर्फाच्या तुकड्यांचा वापर केला पाहिजे. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावर झटपट ग्लो येईल.

3. प्रियंका चोपडा ब्युटी सिक्रेट -

प्रियंका चोपडा ही तिच्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उत्तम डायट फॉलो करते. त्याचबरोबर प्रियंका तिच्या चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावते. दोन-तीन हप्त्यांमधून एकदा ती ही ट्रिक वापरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT