Gym overtraining symptoms saam tv
लाईफस्टाईल

Gym overtraining symptoms: दररोज जीमला जाताय? जर 'ही' लक्षणं दिसली तर समजा शरीर विश्रांती मागतंय!

Side effects of overtraining: आजकाल फिटनेसकडे लक्ष देणे आणि दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम करणे ही चांगली सवय आहे. पण अनेकदा आपण उत्साहाच्या भरात शरीरावर जास्त ताण देतो, ज्यामुळे 'ओव्हरट्रेनिंग'चा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • व्यायामानंतर विश्रांती घेणे आवश्यक आहे

  • स्नायू जास्त वेळ दुखणे हे चिंतेचे कारण

  • सतत थकवा जाणवणे हे लक्षण आहे

आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्यासाठी जीमला जातात. तर काही जण फीटनेससाठीही जीमला जाण्याचा निर्णय घेतात. मात्र कधी कधी विश्रांती घेणं हेच सर्वात उपयुक्त काम ठरतं. खासकरून तेव्हा ज्यावेळी तुम्ही नियमित व्यायाम करता. अशावेळी शरीराला सावरायला वेळ देणं खूप महत्त्वाचं ठरतं.

स्नायूंवर ताण आल्यावर त्यांना पूर्वीप्रमाणे होण्यासाठी विश्रांती गरजेची असते. सतत व्यायाम, कामाचा ताण किंवा पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीर थकून जातं आणि काही विशेष लक्षणं दाखवायला लागतं. हीच शरीराची एक प्रकारची सूचना असते. अशावेळी शरीर तुम्हाला कोणती ५ लक्षणं देत जी तुम्ही ओळखायला पाहिजेत ती जाणून घेऊया.

स्नायूंमध्ये तीव्र दुखापत किंवा जळजळ

जर व्यायामानंतर ७२ तासांपेक्षा जास्त काळ तुमचे स्नायू खूप दुखत असतील तर याचा अर्थ तुमचं शरीर अजूनही रिकव्हर झालेलं नाही. अशा वेळी पुन्हा त्याच स्नायूंवर ताण देणं म्हणजे त्यांना जखमी होण्याची संधीच देणं असतं. त्यामुळे सतत स्नायू दुखणं हे एक मोठं सिग्नल असतं की, तुम्हाला विश्रांती घ्यावी लागणार आहे.

थकवा

थोडं फार थकल्यासारखं वाटणं हे सामान्य आहे. मात्र जर तुम्हाला व्यायाम करतानाच नाही तर रोजच्या आयुष्यातही झोपून राहावंसं वाटत असेल अंगाला जडपणा वाटत असेल तर ही चिंतेची बाब आहे. सततचा थकवा हे शरीर थकलंय, ओव्हरलोड झालंय याचं लक्षण असू शकतं. अशावेळी काही दिवस विश्रांती घ्यायला हवी.

सतत सर्दी-खोकला किंवा इम्युनिटी कमकुवत होणं

जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा ताप येत असेल तर यामागे इम्युन सिस्टीमचं कमजोर होणं हे कारण असू शकतं. अतिव्यायाम किंवा पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.

मनावर ताण येणं किंवा चिडचिड

जर तुम्हाला व्यायाम करायची अजिबात इच्छा नसेल किंवा नेहमीसारखा उत्साह वाटत नसेल तर हे केवळ मानसिक थकवा नाही तर शरीरही मनासारखं साथ देत नाही याचं लक्षण असू शकतं. मूड स्विंग्स, चिडचिड, नैराश्य किंवा अजागळपणा जाणवू लागला तर समजा की मनही ब्रेक मागतंय. अशावेळी एक-दोन दिवस विश्रांती ही फार उपयोगी ठरते.

झोपूनसुद्धा फ्रेश वाटत नाही

अतिव्यायाम किंवा थकवा मेंदूच्या कार्यावर परिणाम करतो आणि त्यामुळे झोपेचं चक्र बिघडतं. तुम्ही ८ तास झोपलात तरी सकाळी उठल्यावर दमल्यासारखं वाटत असेल तर हे नक्कीच योग्य नाही. झोपेची गुणवत्ता खराब होणं हे शरीराला पुन्हा स्थिर करायची गरज आहे याचं संकेत असतं. अशावेळी शरीराला आराम देणं महत्त्वाचं आहे.

व्यायामानंतर विश्रांती का घ्यावी?

शरीराला सावरण्यासाठी, स्नायूंना ताणातून मुक्त करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी.

स्नायू जास्त वेळ दुखत राहिले तर काय करावे?

ताण देणे थांबवा आणि काही दिवस विश्रांती घ्या.

अतिव्यायामामुळे शरीरावर काय परिणाम होतात?

प्रतिकारशक्ती कमी होते, थकवा जाणवतो, मानसिक ताण वाढतो.

चिडचिड किंवा नैराश्य येत असेल तर काय करावे?

एक-दोन दिवस व्यायाम थांबवून आराम करावा.

झोपूनही फ्रेश वाटत नसेल तर काय लक्षण असू शकते?

अतिव्यायामामुळे झोपेचे चक्र बिघडले असू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने उधळले पत्ते, नवा वाद उफाळणार|VIDEO

latur Fight : सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा; छावा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी,VIDEO

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये छावा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

विधानसभेत रम्मी खेळल्याप्रकरणी कोकाटेंवर मुनगंटीवारांचा हल्लाबोल, VIDEO

Pune Koyta Gang : आम्हीच भाई, आमच्या नादाला... पुण्यात हातात कोयते घेऊन तरुणांचा धुडगुस, घटनेचा Video Viral

SCROLL FOR NEXT