Mother's Day Special  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Mother's Day special : मातृदिनानिमित्त अशी भेटवस्तू द्या आईला.

असा साजरा करा मातृदिन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : यंदा ८ मे या दिवशी मातृदिन जगभरात साजरा केला जाणार आहे. तसेच हा दिवस आईबद्दल असणाऱ्या प्रेमाखातर साजरा केला जातो. या दिवशी बहुतांश लोक आपल्या आईसाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतात. अनेकांची तयारी खूप आधीपासून सुरू होते. असे बरेच लोक असतील ज्यांना आईला (Mother) काय द्यायचे हे कळत नसेल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला भेटवस्तूसाठी काही आयडिया देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईचा हा मातृदिन खास बनवू शकता.

हे देखील पहा -

१. तुम्ही तुमच्या आईला भेटवस्तू म्हणून रोपट देऊ शकता. यामुळे तुम्ही खूप हुशार झाला आहात याची जाणीव होईल, तसेच त्या रोपामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

२. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हाताने तयार केलेले ग्रीटिंग कार्ड बनवून ते भेटवस्तू म्हणून आईला द्या. ही सुंदर भेट पाहून तिच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

३. घड्याळ, बांगड्या, अंगठ्या, कानातले, इअरफोन्स, मोबाईल आदी देऊ शकता. तसेच आईला सरप्राईज गिफ्ट म्हणून दागिने (Gold) देऊ शकता.

४. तुमच्या पॉकेटमनी मधून तुम्ही तुमच्या आईला डिनरला घेऊन जाऊ शकता तसेच तुमच्या आईला प्रवास करायला आवडत असेल पण घर आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे तिला कुठेही जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही तिच्यासाठी सरप्राईज ट्रिप प्लॅन करू शकता. आजूबाजूला किंवा कुठेतरी लांबच्या प्रवासाला तिला घेऊन जाऊ शकतात.

५. आईसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खास असतो. तुमच्या खास क्षणांची फ्रेम तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. केक-चॉकलेट्स देऊन हा दिवस तुम्ही साजरा करु शकता.

६. आई गृहिणी असो किंवा वर्किंग वूमन असो, कुटुंबाची काळजी घेणे आणि सर्व कामांमध्ये तिला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तिला स्किन केअर किट भेट देऊ शकता.

७. तुम्ही तुमच्या आईला चित्रपट - नाटक पाहायला देखील घेऊन जाऊ शकता. तसेच मदर्स डे, स्पेशल म्हणून तुम्ही तुमच्या आईसाठी एक सुंदर चिठ्ठी लिहू शकता, ज्यामध्ये तुम्ही तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही भेटवस्तू देऊन मदर्स डे साजरा करू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT