Gel Nail Polish  Saam Tv
लाईफस्टाईल

सावधान; तुम्ही नखांवर नेल पेंट लावता का, हा घातक आजार असू शकतो...

स्त्रिया त्यांची नख सुंदर दिसण्यासाठी नेलपॉलिश लावतात, परंतु हे धोकादायक असू शकते कारण नेलपेंटमध्ये अनेक हानिकारक रसायने मिसळली जातात, ज्यामुळे घातक रोगांचा धोका वाढू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्त्रिया त्यांची नख सुंदर दिसण्यासाठी नेलपॉलिश लावतात, परंतु हे धोकादायक असू शकते कारण नेलपेंटमध्ये अनेक हानिकारक रसायने मिसळली जातात, ज्यामुळे घातक रोगांचा धोका वाढू शकतो. केस आणि चेहऱ्याप्रमाणे नखांचीही काळजी घेतली पाहिजे. यासाठी मार्केटमध्ये मॅनिक्युअर, पेडीक्योर अशा गोष्टी उपलब्ध आहेत. आता गेल्या काही वर्षांत नखांची नीट निगा राखणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. बहुतेक मुली आपली नख सुंदर बनवण्यासाठी नेलपेंट लावतात.

मार्केटमध्ये विविध रंगांचे नेलपॉलिश सहज उपलब्ध असतात. आणि स्त्रिया त्यांना खूप आवडीने लावतात, परंतु तुम्हाला माहित आहे का, या नेल पेंटमुळे घातक आजार देखील होऊ शकतात. नेलपेंटमधील घातक केमिकलचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया नेल पेंट्स हानिकारक कसे असतात.

नेल पॉलिशचे दुष्परिणाम

१.नेलपॉलिशचा सतत वापर केल्याने नखांचा रंग खराब होतो. जेल नेलपॉलिश सुकविण्यासाठी वापरण्यात येणारे लाईटमुळे अतिनील किरण तयार होतात त्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्व येऊ शकते.

२.रासायनिक उत्पादनांनी नेलपॉलिश काढल्याने नखे खडबडीत होऊ शकतात. नखांचा नैसर्गिक रंग खराब होऊ नखे ​​तुटतात शकतात. तेव्हा जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

३.नेलपॉलिशमधील घातक केमिकल नखांमध्ये जाऊन अनेक समस्या निर्माण करू शकतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

४. रासायनिक नेलपॉलिशमुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

५. नेलपॉलिशमुळे हृदयाचे धोकादायक आजारही होऊ शकतात. केमिकल नेलपॉलिशमुळे कॅन्सरचा धोकाही निर्माण होत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

नेलपॉलिशचे धोके कसे टाळायचे

१. नेलपॉलिश लावले असेल तर ते जास्त दिवस ठेऊ नका.

२. नेलपॉलिश स्वतः काढू नका त्यासाठी मॅनिक्युरिस्टचा सल्ला घ्या.

३.अतिनील प्रकाश कसे टाळावे.

४.नेलपॉलिश फक्त खास प्रसंगीच लावा. आपल्या नखांची वेळोवेळी काळजी घ्या.

५. कमी रसायने असलेले फक्त नेलपॉलिश ब्रँड वापरा.

Edited by- अर्चना चव्हाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

SCROLL FOR NEXT