Positive parenting tips in Marathi
Positive parenting tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मुलांना या चांगल्या सवयी लावा, अन्यथा होईल त्यांचे नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढत्या वयात मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी दररोज बदलत राहातात. अशावेळी पालकांना मुलांची अधिक चिंता वाटू लागते. (Positive parenting tips in Marathi)

हे देखील पहा

वाढत्या वयात मुलांची (Child) भूक अधिक वाढू लागते त्यामुळे त्यांचे मन अधिकतर बाहेरचे पदार्थ खाण्यास त्यांना प्रोत्साहन देत असते. मुलांना कधीकधी जास्त खावेसे वाटते तर कधीकधी कमी परंतु, पालक म्हणून आपण मुलांच्या आहारात आरोग्यदायी पदार्थ ठेवायला हवे. तसेच, मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी शिकवणे महत्त्वाचे आहे कारण त्यांचा फायदा फक्त बालपणातच नाही तर त्यांना आयुष्यभर होतो. लहानपणापासूनच मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी आपण शिकवल्या पाहिजेत. त्यांना कोणत्या सवयी लावायला पाहिजे हे पाहूया.

या सवयी मुलांना लावा.

१. मुलांच्या आहारात हिरव्या भाज्या, मसूर, भात, रोटी अशा विविध रंगांच्या गोष्टी असायला हव्यात. त्यांना रोज फळे खाण्याची सवय लावा. मुलं अशी पदार्थ (Food) खाण्यास नखरे करत असतील तर त्यांना लाडीगोडी लावून ते पदार्थ खाऊ घाला. त्या पदार्थाचे आहारात किती महत्त्व आहे ते त्यांना समजावून सांगा.

२. मुले बाहेर खेळायला जात असतील तर आपण त्यांना पाण्याची बाटली सोबत द्या. त्यांना भाज्यांचे किंवा फळाचे ज्यूस पिण्याची सवय लावा. तसेच त्यांना शीतपेयांपासून दूर ठेवा. उन्हाळ्यात मुलांना नारळपाणी, ताक, लस्सी इत्यादी देऊ शकतात.

३. आपल्या घरातील प्रत्येक वयोगटातील मुले सकाळचा नाश्ता करत नाही. सकाळी लवकर शाळेत जाण्याच्या घाईत आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा भाग मुले खाण्यास टाळतात. त्यांना नाश्त्याचे महत्त्व समजावून सांगा.

४. खाताना मुलांना हे कळायला हवे की, आपले पोट आता भरले आहे. काही मुले पोट भरलेले असून सुद्धा गरजेपेक्षा जास्त खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

५. अन्न खाताना मुलांना ते नीट चावून व हळूहळू खाण्यास शिकवा. त्यांना अन्न व्यवस्थित चघळण्याची सवय लावा.

६. मुलांना अति फास्ट फूड (Fast food) खाण्यास देऊ नका. पालकांनी त्यांच्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तसेच महिन्यातून कधीतरी मुलांना बाहेरचे पदार्थ खाऊ द्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, वारासणीमधून निवडणूक लढवणार

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचे प्रेम मिळणार, तुमच्या राशीत काय?

Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT