Cracked heels tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Skin Care : भेगा पडलेल्या टाचांपासून अशी मिळवा सुटका!

भेगा पडलेल्या टाचांसाठी काही घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. आपल्या शरीरातील सर्वात सुंदर भाग म्हणजे आपले पाय. पण त्याच पायांना भेगा पडल्या असतील तर..? व्यवस्थित काळजी न घेतल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या वाढते. तर शरीराच्या या भागाला सर्वात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

हे देखील पहा -

उन्हाळ्यात पायांची त्वचा बहुतांश कोरडी पडते त्यामुळे आपले पाय सर्वात वाईट दिसतात आणि सौंदर्य बिघडवतात. भेगा पडलेल्या टाचा दुखतात. खडबडीत, फ्लॅकी, लाल आणि खाज सुटणाऱ्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

भेगा पडलेल्या टाचांसाठी काही घरगुती उपाय

१. पॅराफिन वॅक्स-

एका पॅनमध्ये थोडेसे पॅराफिन वॅक्स खोबरेल तेलात गरम करा. मेण वितळल्यानंतर रात्रीच्या वेळी भेगा पडलेल्या टाचांना लावा आणि पाय सुती कापडाने झाकून ठेवा. सकाळी पाय स्वच्छ धुवा.

२. खोबरेल तेलाचा वापरा-

नारळाच्या तेलात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. रात्री झोपताना पाय चांगले स्वच्छ करून कोरडे पुसून घ्या, नंतर खोबरेल तेलाने पायाची मालिश करा. दररोज असे केल्यास भेगा भरुन निघण्यास मदत होईल.

३. ग्लिसरीन -

ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिक्स करून भेगा पडलेल्या ठिकाणी लावावे. लावल्यानंतर २० मिनिटे थांबा आणि नंतर थंड (Cold) पाण्याने (Water)धुवा. ग्लिसरीनच्या नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे टाचा मऊ होतात.

४. ऑलिव्ह ऑइल (Oil)-

ऑलिव्ह ऑईलमध्ये लॅव्हेंडर ऑइलचे काही थेंब टाका. आणि ते काचेच्या बाटलीत भरा. नंतर त्यात तेवढेच पाणी घालून चांगले मिसळा. तुमची होममेड फूट केअर क्रीम वापरण्यासाठी तयार आहे.

५. मध-

टाचांच्या भेगा दूर करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. एक बादली कोमट पाण्यात एक कप मध घाला. पाण्यात मध मिसळवून त्यात तुमचे पाय सुमारे १५ ते २० मिनिटे भिजवा. नंतर पाण्याने पाय स्वच्छ करा.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT