Garuda Purana and sin saam tv
लाईफस्टाईल

Garuda Purana: महिलांना 'ही' 3 कामं करताना पुरुषांनी पाहणं म्हणजे महापाप; नरकात भोगाव्या लागतात यातना

Garuda Purana and sin: गरुड पुराण हे हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक आहे, ज्यात जीवन, मृत्यू, कर्म आणि पाप-पुण्याचे सखोल ज्ञान दिले आहे. या पुराणानुसार, मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ त्याला मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वर्ग आणि नरकाचे स्वरूप तसंच तिथे मिळणारे सुख-दुःख यांचे सविस्तर वर्णन केलंय. स्वर्गाची कल्पना केली तर आनंद, शांती आणि वैभव यांची आठवण होते. पण नरकाचे नाव जरी उच्चारलं तरी मनात भीती निर्माण होते. नरकाची तुलना लोक उकळत्या तेलात टाकणं, वैतरणी नदी पार करणे आणि विविध प्रकारच्या कठोर शिक्षा भोगणे अशा भयंकर प्रसंगांशी करतात

गरुड पुराणात याचं तपशीलवार वर्णन आहे. तसेच या पुराणात महिलांशी संबंधित काही खास नियमही सांगितले आहेत. त्यामध्ये पुरुषांनी महिलांना तीन विशिष्ट प्रसंगांमध्ये पाहू नये, असे स्पष्ट सांगितले आहे.

सुखी जीवनासाठी गरुड पुराणातील मार्गदर्शन

गरुड पुराणानुसार, जर माणसाने त्यात सांगितलेल्या नियमांचं आणि शिकवणीचे पालन केलं तर तो पाप आणि वाईट कृत्यांपासून दूर राहून आनंदी आणि समाधानाचे जीवन जगू शकतो. अशा व्यक्तींना मृत्यूनंतर नरकाला जावं लागत नाही. म्हणूनच गरुड पुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक मानलं जातं. ते मोक्षाचा मार्ग दाखवणारे ग्रंथ मानलं जातं.

हे तीन प्रसंग पाहणे म्हणजे महापाप

गरुड पुराणात नमूद केलं आहे की, महिलांनी काही प्रसंगी केलेली कृत्यं पुरुषांनी पाहू नयेत. हे त्यांच्या सन्मान आणि मर्यादेशी संबंधित असल्यामुळे अशा कृतींकडे पाहणाऱ्याला महापापी मानलं जातं आणि त्याला नरकातील कठोर शिक्षांपासून सुटका मिळत नाही.

स्तनपान करताना

जर एखादी स्त्री आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्या वेळी पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. हे मातृत्वाशी निगडित पवित्र कार्य असून ते गोपनीय ठेवणं योग्य मानलं जातं. हा नियम तोडल्यास नरकात कठोर यातना भोगाव्या लागतात.

स्नान करताना

एखादी महिला स्नान करत असेल मग ते घरात असो किंवा नदी, तलाव अशा सार्वजनिक ठिकाणी असो तिच्याकडे पाहणं हे गंभीर पाप मानलं गेलंय आहे. हा नियम मोडणाऱ्याला नरकात भीषण यातना भोगाव्या लागतात.

कपडे बदलताना

जर महिला कपडे परिधान करत असेल किंवा बदलत असेल, तर त्या वेळी पुरुषाने तिच्याकडे पाहू नये. हेही पापाच्या श्रेणीत मोडतं आणि असं करणाऱ्याला मृत्यूनंतर नरकात कठोर शिक्षा मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

Ekta Kapoor: सैनिकांचा अपमान, केस दाखल तरीही अॅक्शन नाही; पोलिसांनी कोर्टाला सांगितले 'या' कारणामुळे एकता कपूरवर नाही केली कारवाई

शिक्षकांच्या पगार घोटाळ्यावर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; विशेष समिती करणार पडताळणी|VIDEO

SCROLL FOR NEXT