Bharat Jadhav
गरुड पुराणात मृत्यूनंतर काय होतं याचे विस्तृत वर्णन दिलंय. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या एका तासाआधी काय दिसते ते जाणून घेऊ.
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर असते तेव्हा त्याला आपल्या पूर्वजांचे दर्शन होते. ते त्याला स्वतःकडे बोलावत आहेत असे दिसतं.
मृत्यूच्या शेवटच्या क्षणी व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील चांगल्या आणि वाईट कर्मांची आठवण होऊ लागते.
जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा यमदूत व्यक्तीकडे येतात. हे यमदूत व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्या पुढच्या जन्मात किंवा जगात घेऊन जातात.
मरण्यापूर्वी व्यक्तीला एक रहस्यमय दरवाजा दिसतो. हा दरवाजा प्रकाश किंवा ज्वाळांनी वेढलेला असल्याचं म्हटलं जातं. हा दरवाजा आत्म्याला पुढील जगाचा मार्ग दाखवत असतो.
काही लोकांना मरण्यापूर्वी अंधार दिसतो. तर काहींना प्रकाश दिसतो. काही लोक स्वर्ग किंवा नरकासारखी ठिकाणे पाहिल्याचा दावा करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
येथे क्लिक करा