Ganesh Visarjan 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Visarjan 2024: अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जन केव्हा करायचं? नोट करा तीन शुभ मुहूर्त

Ganesh Visarjan Muhurat : अनंत चतुर्दशीला भद्रा काळ सुरू होत आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जन केव्हा करायचं? त्यासाठी शुभ काळ कोणता? याची जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

अनंत चतुर्दशी यंदा १७ सप्टेंबर रोजी आली आहे. या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होऊन १० दिवसांचा काळ लोटलेला असतो. काही व्यक्ती आपल्या घरी १० दिवसांचे गणपती बसवतात. अशात गणेश विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय मुहूर्त आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

या वर्षी अनंत चतुर्दशीची तिथी १७ सप्टेंबर आली आहे. या दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन करणे अत्यंत शूभ मानले जाते. अशात या वर्षी १० व्या दिवशी भद्रा काळ सुरू होत आहे. त्यामुळे बाप्पाला निरोप देण्याची योग्य वेळ कोणती यावरून प्रत्येक व्यक्तीच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

गणपती विसर्जनाचे ३ शुभ मुहूर्त

पंचांगातील माहितीनुसार, गणपती विसर्जनासाठी तीन मुहूर्त देण्यात आले आहेत.

पहिला मुहूर्त सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुरू होतोय. तर दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असणार आहे.

दुसरा मुहूर्त दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत सुरू राहिल.

तिसरा मुहूर्त संध्याकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सुरू होईल. तर ९ वाजून १९ मिनिटांनी संपणार आहे.

म्हणून या वर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आपल्याला ६ तास ५६ मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. म्हणजेच शुभ मुहूर्तात एकूण ४१६ रुपये असणार आहेत.

भद्रा काळ

अनंत चतुर्दशी तिथिची सुरुवात १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुरू होत आहे. तर १७ सप्टेंबरला ११ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळात भद्राकाळ किती वेळ असणार आहे? याची माहिती जाणून घेऊ. सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी भद्रा काळ सुरू होत आहे. तर ०९ वाजून ५५ मिनिटांपर्यंत हा काळ असाच राहणार आहे. याकाळात कोणतंही शुभ कार्य करू नये असं म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

SCROLL FOR NEXT