Ganesh Chaturthi Recipe 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi Recipe 2023 : गणरायासाठी बनवा ड्राय फ्रुट्स मोदक एकदम सोप्या पद्धतीने, मिनिटात बनतील

How To Make Dryfruits Modak : तुम्ही देखील लाडक्या बाप्पासाठी मोदक बनवायच्या बेतात असतील तर ड्रायफुट्सचे मोदक ट्राय करु शकता.

कोमल दामुद्रे

DryFruits Modak Recipe:

महाराष्ट्रात गणपतीचा उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा १० दिवसात गणपतीची पूजा आणि अर्चना केली जाते. या दिवसात बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ. गणेशोत्सवात गणपतीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या काळात अनेक वेगवेगळे पदार्थ असतात. पण मोदक हा सगळ्यात आवडीने बनवला जाणारा पदार्थ आहे. मिठाईच्या दुकानात आपल्याला अनेक रंगाचे मोदक पाहायला मिळतात. जर तुम्ही देखील लाडक्या बाप्पासाठी मोदक बनवायच्या बेतात असतील तर ड्रायफुट्सचे मोदक ट्राय करु शकता.

1. साहित्य

  • अंजीर 6

  • खजूर 8

  • बदाम (Almond) १५-१६

  • अक्रोड 1 टीस्पून

  • शेंगदाणे 12-13

  • पिस्ता ५-६

  • काजू 9-10

  • तीळ- १ टिस्पून

  • खसखस- १ टीस्पून

  • डेसिकेटेड नारळ- 1 टीस्पून

  • तूप- १ टेस्पून

  • मनुका- १०

  • जर्दाळू चिरलेली- ५

  • वेलची पावडर- १ टीस्पून

2. कृती

  • सर्वप्रथम अंजीर दोन तास भिजत ठेवा.तसेच खजूर दोन तास भिजवा.

  • बदाम, शेंगदाणे, अक्रोड, पिस्ता आणि काजू ग्राइंडरमध्ये घ्या. सगळ्याची एकत्र पेस्ट तयार करुन घ्या

  • कढईवर शेंगदाणे घालून परतून घ्या. आता दुसऱ्या पॅनमध्ये तीळ, सुके खोबरे, खसखर घालून चांगले भाजून घ्या.

  • त्यानंतर भिजवलेले अंजीर आणि खजूरची पेस्ट तयार करा. कढईत तूप घेऊन त्यात अंजीर-खजूरची पेस्ट घाला.

  • चांगले परतून घ्या आणि त्यात बेदाणे- जर्दाळू घाला, त्यात ड्रायफ्रुट्सची पेस्ट घाला.

  • त्यात सुके खोबरे आणि वेलची पावडर घाला. त्यानंतर मोदका साचा घेऊन त्यात सारण भरा. तयार होतील लाडक्या बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT