Ganesh Chaturthi 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2023 : शुभ कार्यात पहिली पूजा श्रीगणेशाची का केली जाते? जाणून घ्या कारण

Reason Lord Ganesha Is Worshiped First : तुम्हाला माहित आहे का प्रत्येक धार्मिक कार्यात श्रीगणेशाला आधी का पुजले जाते? जाणून घेऊया कारण

कोमल दामुद्रे

Why Lord Ganesh Is Worshiped First :

आजपासून घरोघरी आणि मोठ्या मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. वाजत-गाजत लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या १० दिवसाच्या काळात सर्वत्र बाप्पाचा जयघोष ऐकू येईल.

यंदा गणेश चतुर्थी ही मंगळवारी आल्यामुळे महागणपती म्हणून ओळखले जाईल. प्रत्येक धार्मिक कार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाते. तसेच व्रत देखील केले जाते. गणेशाची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. परंतु तुम्हाला माहित आहे का प्रत्येक धार्मिक कार्यात श्रीगणेशाला आधी का पुजले जाते? जाणून घेऊया कारण

धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, देवांमध्ये श्रेष्ठत्वाबाबत वाद झाला होता. त्यावेळी सर्व देव एकमेकांना श्रेष्ठ म्हणू लागले. यावेळी नारदमूनींनी शंका उपस्थित केली आणि शंकराचा आश्रय घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी सर्व देव महादेवा पर्यंत पोहोचले. त्यावेळी महादेव म्हणाले. तुमच्यापैकी जो कोणी ब्रम्हांडाला पहिला फेरा मारुन परत येईल त्याची प्रथम पूजा केला जाईल.

हे ऐकून सर्व देव आपल्या वाहनांवर आरुढ झाले आणि ब्रम्हांड प्रदक्षिणा करण्यास निघाले. तेव्हा श्रीगणेशांनी आपले आई-वडील अर्थात महादेव (Shiva) आणि माता पार्वतीला सात प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांना शरण गेले. काही काळानंतर सर्व देव एक एक करून कैलासात परतले.

सर्वजण परतल्यानंतर भगवान शिवाने गणपती (Ganesh) बाप्पाला विजयी घोषित केले . हे ऐकून सर्व देव चकित झाले. त्यावेळी भगवान शिव म्हणाले की, आई-वडिलांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची प्रथम पूजा करून सेवा केली जाते. त्यामुळे आजपासून प्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाणार आहे. भगवान शंकराचा निर्णय सर्व देवतांनी मान्य केला. अनादी काळापासून गणपतीची पूजा (Puja) प्रथम केली जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Sleeping Problem: रात्री झोप लागत नाही? जाणून घ्या झोप न येण्याची ७ कारणं आणि करा हे उपाय

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

SCROLL FOR NEXT