नवरात्रीला सुरुवात झाली असून या काळात अनेकांनी उपवास धरला असेल. एखादा उत्सव म्हटला की, खाण्यापिण्याची रेलचेल ही आली. तळलेले, गोड पदार्थ खाल्ल्याने कॅलरीज वाढून वजन वाढण्याचा धोकाही असतो. मात्र या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला फीट राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला खास टीप्स देणार आहोत.
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना सणांच्या बहाण्याने वजन वाढण्याची चिंता वाटतेय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सणासुदीच्या दिवसांत जर जास्त खाऊन तुमचं वजन वाढत असेल तर आम्ही तुम्हाला योगाची काही आसनं सांगणार आहोत. या आसनांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता.
वजन कमी करायचं असेल त्यावेळी संतुलित आहार घेणं महत्त्वाचं असणार आहे. सणासुदीच्या जेवणात जीवनसत्त्वं, खनिजं, प्रोटीन आणि कर्बोदके यांचा समावेश करावा. तसंच यावेळी भरपूर पाणी प्या आणि जेवणामध्ये किमान 3-4 तासांचे अंतर ठेवा.
तुमचं पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणारं हे एक उत्तम आसन आहे. जेवल्यानंतर हे आसन केलं जाऊ शकतं. हे आसन करण्यासाठी तुमचे हात आपल्या बाजूला ठेवून सरळ उभे राहून सुरु करा. यानंतर काहीसं पुढे झुका आणि हळू हळू आपले गुडघे आपल्या चटईवर ठेवा. आपल्या पायाची बोटं बाहेरच्या दिशेने करा. तुमच्या मांड्या काल्फ मसलवर दाबल्या पाहिजेत. आपल्या टाच एकमेकांच्या जवळ ठेवा. तुमची पाठ सरळ करा आणि पुढे पहा.
यामध्ये दोन्ही पाय जमिनीवर ठेवून सरळ उभे राहा. आराम न करता खाली बसा आणि पाय एकमेकांच्या जवळ ठेवा. यावेळी हातांनी पाय धरा आणि समोरचा एक पाय पुढे करा. यावेळी संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना पाठीचा कणा तटस्थ असावा.
रुवातीला वज्रासनात बसून गुडघ्यांवर उभे राहा.यानंतर दोन्ही हात समोर न्या आणि त्यानंतर हात कानावरून मागे घ्या. शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झुकवण्याचा प्रयत्न करा. हातही पूर्णपणे मागे न्या आणि टाच पकडण्याचा प्रयत्न करा. यावेळी मान वळवून डोकं मागे नेण्याचा प्रयत्न करा.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.