liver disease symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver signs on hands: हाताच्या तळव्यांतील हे बदल साधे नाहीत; लिव्हरच्या गंभीर समस्येची लक्षणं असू शकतात

Liver disease symptoms: लिव्हरच्या समस्यांची सुरुवातीची लक्षणं अनेकदा हातांवर दिसून येतात. लाल तळवे, नखांचा रंग बदल, बोटांची सूज किंवा खाज ही फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस आणि सिरोसिससारख्या आजारांचे संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानलं जातं. रक्तातील टॉक्सिन घटक काढणं, पचनास मदत करणं आणि हार्मोन्सचे संतुलन राखणं ही कामं लिव्हरच्या माध्यमातून केली जातात. मात्र ज्यावेळी या अवयवामध्ये बिघाड होतो तेव्हा कोणतीही मोठी लक्षणं दिसून येत नाही. अनेकदा लिव्हरच्या समस्यांची लक्षणं ही हातांमध्ये दिसून येतात.

लाल तळवे, त्वचेला येणारी खाज, नखं तुटणं किंवा रंग फिकट होणं ही लक्षणं फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस किंवा सिरोसिससारख्या आजारांकडे इशारा देतात. हे संकेत लवकर ओळखल्यास गंभीर गुंतागुंत टळू शकते. लिव्हरच्या समस्यांची कोणती लक्षणं हातांवर दिसून येतात ते पाहूयात.

तळव्यांचा रंग लाल होणं

जर हाताचे तळवे लाल दिसत असतील तर ते पाल्मर एरिथेमा असू शकतं. लिव्हर जेव्हा नीट काम करत नाही तेव्हा रक्तात इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हा बदल दिसतो. काही वेळा हे निरोगी व्यक्तींमध्येही दिसू शकतं. मात्र थकवा किंवा कावीळ यांसारखी इतर लक्षणं असल्यास ते लिव्हर आजाराचे संकेत असू शकतात.

बोटं वाकणं

बोटं आतील बाजूला वाकलेली दिसणं हे डुप्युट्रेन कॉन्ट्रॅक्चरचं लक्षण मानण्यात येतं. तळहाताखालील पेशी जाड होत गेल्याने बोटांची हालचाल कठीण होते. हे विशेषतः सिरोसिससारख्या लिव्हरच्या आजारांमध्ये आणि जास्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसतं.

नखांचा रंग पांढरा होऊन गुलाबी पट्टी दिसणं

नखे पूर्णपणे पांढरी दिसणं आणि टोकाला हलकी गुलाबी किंवा लाल पट्टी दिसणं हे टेरी’स नेल्सचं लक्षण आहे. लिव्हर सिरोसिसमुळे रक्तप्रवाह आणि प्रोटीनच्या पातळीत बदल होतात आणि त्यामुळे ही नखांमध्ये हे संकेत दिसतात. हे लक्षण हृदयविकार किंवा मधुमेहातही दिसू शकतं.

बोटांची टोकं काहीशी फुगणं

नखांचा आणि बोटांच्या टोकांचा आकार गोल आणि फुगलेला दिसणं हे नेल क्लबिंगचं लक्षण आहे. हे सहसा फुफ्फुस किंवा हृदयाच्या आजारांशी संबंधित मानलं जातं. मात्र अनेकदा याचा संबंध लिव्हरच्या समस्येशीही असू शकतो. रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन पुरवठ्यातील बदलांमुळे नखांची रचना बदलते. हे लक्षण दिसल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

हात स्थिर न राहणं

हात पुढे धरल्यावर अचानक थरथरणं किंवा झटके जाणवणं हे अ‍ॅस्टेरिक्सिसचं लक्षण मानलं जातं. हा लिव्हरच्या हेपॅटिक एन्सेफालोपॅथीचे संकेत असतात. लिव्हर टॉक्सिन घटक बाहेर काढू शकत नाही तेव्हा मेंदूवर परिणाम होतो. अशावेळी रूग्णाला हात थरथरण्याचा त्रास होऊ शकतो.

तळवे आणि पायांमध्ये खाज येणं

कोणतेही रॅशेज नसतानाही तळवे आणि पायांमध्ये सतत खाज येणं हे कोलेस्टेसिसचं लक्षण असू शकतं. या अवस्थेत पित्ताच्या प्रवाहात अडथळा येतो. त्वचेखाली bile salts साचल्यामुळे खाज अधिक प्रमाणात येऊ शकते. ही खाज रात्री किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर अधिक वाढू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bird Flu : मोठी बातमी! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी, कुठे लागू केला आहे हा निर्णय?

Maharashtra News Live Update : रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

Raja Shivaji Show Cancel: मुंबईतल्या प्रसिद्ध थिएटरमध्ये 'राजा शिवाजी'चा शो अचानक रद्द; प्रेक्षकांचा संताप अनावर

Cucumber Benefits For Face: उन्हाळ्यात चेहऱ्यावर काकडीचा असा करा वापर, पार्लरमधील महागडे फेशियल विसरून जाल

Video : जुगाड! टॅलेंट भारताबाहेर जायला नको; पठ्ठ्याने २ शेळ्यांना स्कुटीच्या डिक्कीत बसवून गावभर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT