Kitchen Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Tips : भेंडी बनवण्यापासून ते मसाला भाजण्यापर्यंत स्वयंपाकघरातील 'या' टिप्स फॉलो करा, जेवण होईल अधिक चविष्ट

Food Tips : एखादी रेसिपी शिकताना त्यासोबतच काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर जेवणाची चव अधिक चविष्ट होते.

कोमल दामुद्रे

Basic Cooking Tips For Beginners : जेवण चविष्ट होण्यासाठी चांगल्या रेसिपी सोबतच काही छोटया गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे एखादी रेसिपी शिकताना त्यासोबतच काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर जेवणाची चव अधिक चविष्ट होते.

भेंडी बनवताना जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर भेंडी चिकट बनते किंवा भात बनवताना देखील बऱ्याच वेळा असे होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील अशा काही टिप्स (Tips) सांगणार आहोत जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

1. भेंडीची भाजी बनवत असताना भेंडीचा चिकटपणा दूर करण्यासाठी भेंडीच्या भाजीमध्ये शेवटी मीठ घाला.

2. भात बनवत असताना भात चिकट होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी उकळत्या पाण्यात तांदूळ (Rice) टाकण्याआधी चमचाभर तेलात (Oil) लिंबाचे काही थेंब टाकावे त्यामुळे भात चिकट होत नाही.

3. ज्या पाण्यात भाज्या उकळल्या आहेत ते पाणी फेकू नका. त्या पाण्याचा वापर ग्रेव्हीमध्ये किंवा सूपमध्ये वापरा. असे केल्याने भाजी चवदार होते.

4. गरम तेलात लसूण,आले, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ घालून जास्त वेळ शिजवल्याने भाजीची चव वाढते.

5. सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी भाजीमध्ये अर्धा लिंबू पिळा.

6. छोले किंवा राजमा रात्रभर भिजवायला विसरला तर राजमा / छोले तासभर उकळत्या पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर शिजवा.

7. हिरव्या भाज्या शिजवताना नेहमी त्यावर झाकण ठेवा यामुळे जीवनसत्वे बाष्पीभवन होत नाहीत.

8. टोमॅटोवरील साल काढण्यासाठी एका मोठ्या भांड्यात उकळत्या पाण्यात टोमॅटो टाकून साधारण पाच मिनिटापर्यंत राहून द्या. असे केल्यास टोमॅटोवरील साल सहज निघते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

SCROLL FOR NEXT