Shukrawar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Shukrawar che Upay : चुंबकासारखा खेचला जाईल पैसा; शुक्रवारी लक्ष्मीची पुजा करताना हे उपाय नक्की करा

Dhan Prapti Ke Upay : आज शुक्रवार आहे आणि आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पुजा करणं शुभ मानलं जातं. या पुजेच्या वेळी तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुक्रवारच्या दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित केला आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते, जेणेकरून त्या व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात. ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्रवारी खास उपाय देखील करायला सांगितले आहे. हे उपाय केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं. याशिवा घरात सुख-समृद्धी आणि धनाची वाढ होते, असंही म्हटलं जातं.

आज आम्ही तुम्हाला शुक्रवारी करण्यात येणाऱ्या उपायांबाबत माहिती देणार आहोत. शुक्रवारी लक्ष्मीसाठी हे उपाय तुम्ही करू शकतो. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

माता लक्ष्मीला लाल बांगड्या आणि वस्त्र अर्पण करा

शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लक्ष्मीची पूजा करा. यावेळी देवीला लाल बांगड्या आणि वस्त्र भेट द्या. विवाहित महिलांसाठी हा उपाय फार फलदायी ठरतो. असं केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देते.

पान, लवंग, मध अर्पण करा

जर तुम्हाला तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडायचे असतील तर हा उपाय तुम्ही करू शकता. यामध्ये शुक्रवारी लक्ष्मीची पूजा ककरा. यावेळी एका पानावर लवंग आणि मध लावून ते पान देवीला अर्पण करा. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होण्यास मदत होते.

मोगऱ्याचं अत्तर किंवा माळ

शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी पूजेच्या वेळी मोगऱ्याचं अत्तर किंवा माळ देवीला अर्पित केली पाहिजे. हे फूल देवी लक्ष्मीला प्रिय आहे. यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरातील समस्या दूर होते.

खीरीचा प्रसाद

देवी लक्ष्मीची पूजा करताना तिला खीरीचा प्रसाद फलदायी मानली जातेय. असं केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. यावेळी तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासही मदत होते.

कणेरची फूल चढवा

आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पुजा करताना माता लक्ष्मीला लाल रंग किंवा पांढऱ्या कणेरची फूल चढवा. असं केल्याने तुमच्या मनाजोग्या गोष्टी घडू शकणार आहेत. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT