Fashion tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Fashion Tips कमी उंचीच्या मुलींनो, अशी करा ड्रेसिंग स्टाईल

कमी उंचीच्या मुलींनी अशी करा ड्रेसिंग स्टाईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुलींकडे अधिक प्रकारचे कपडे असतात. नवनवीन ट्रेंडनुसार त्यांच्याकडे कपड्यांचे कलेक्शन असते. तसेच त्यांच्याकडे प्रत्येक फक्शन आणि सणासाठी वेगवेगळे ड्रेसचे कलेक्शन असते, पण कमी उंच असलेल्या मुलींना नेहेमीच कपडे परिधान करताना त्रास होतो. त्यांना कोणतेही कपडे परिधान करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. फॅशनसोबतच त्यांना त्यांच्या उंचीचे देखील भान राखावे लागते. तसेच तुमच्या कमी उंचीबद्दल अधिक विचार करून तुमचा आत्मविश्वास देखील डळमळतो. तुम्ही तुमच्या उंचीनुसार कोणते कपडे परिधान करायला हवे हे आपण जाणून घेऊया.

हे देखील पहा -

अशी करा कपड्यांची स्टाईल.

१. पारंपारिक कपडे घालायचे असतील तर नेहमी लांब कुर्तीसोबत चुरीदार-पायजमा घाला. अनारकली सूट घालत असाल तर, व्ही आकाराचा नेक घालू शकता. तुमची उंची कमी असेल तर सलवार आणि पलाझो घालणे शक्यतो टाळा. याशिवाय, तुमचे खांदे रुंद असतील, तर चायनीज कॉलर आणि पफ्ड स्लीव्हज घालणे देखील टाळावे.

२. कमी उंच असलेल्या मुली (Girl) बऱ्याचदा कॅप्री आणि थ्री क्वार्टर ट्राउझर्स घालण्यास प्राधान्य देतात, परंतु कमी उंचीच्या मुलींनी असे कपडे घालणे टाळले पाहिजेत. त्याऐवजी, स्लिम लोअर कपड्यांना अधिक प्राधान्य द्यावे. तसेच वरपासून खालपर्यंत मोनोक्रोम पॅटर्नचे कपडे घालावेत.

३. उच्च कंबरेच्या जीन्स घातल्यामुळे कमी उंचीच्या मुलींची उंची चांगली दिसते. त्याबरोबर जीन्ससोबत डार्क रंगाचा टॉप घालावा, तसेच तुम्ही फॉर्मल शर्टही कॅरी करू शकता. टर्टल, बोट नेक ऐवजी व्ही शेप नेकही तुम्ही घालू शकता.

४. उभ्या स्ट्रीप पॅंट, जीन्स (Jeans), स्लिट्स आणि स्कर्ट कमी उंचीच्या मुलींसाठी अनुरूप कपडे आहेत. हिवाळ्यात, आपण कार्डिगन्स आणि जॅकेट घालू शकता. खरेदी करताना फक्त लहान प्रिंटचे कपडे खरेदी करा.

५. कमी उंचीच्या मुलींना बऱ्याचदा साडी (Saree) नेसण्याची आवड असते. पण अशावेळी त्यांनी बॉर्डर आणि छोट्या प्रिंट असलेल्या साड्यांची खरेदी करावी. वजन कमी असणाऱ्या मुलींनी शिफॉन, जॉर्जेटच्या साड्यांना परिधान करावे. तसेच जर आपले वजन अधिक असेल तर तुम्ही सिल्क, कांजीवरम, कॉटनच्या साड्या घालाव्यात.

६. कमी उंचीच्या मुलींनी केस जास्त लांब ठेवू नयेत. तसेच, तुमची उंची कमी असेल तर मॅक्सी ड्रेस ट्राय करू नये. या ड्रेसमध्ये तुमची उंची अगदी कमी दिसेल. तरी देखील मॅक्सी ड्रेस तुम्हाला घालायचा असेल तर खालून जास्त गोलकार असलेला ड्रेस घालू नका.

अशाप्रकारे कमी उंचीच्या मुली ड्रेसिंग स्टाईल करु शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालना जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजा चिंतेत

रामाचा मुलगा हरवला अन् सद्दाम खान देवदूतासारखा धावून आला, ताटातूट झालेल्या माय-लेकराच्या भेटीने पोलीसही गहिवरले

Pimpari Chinchwad: नकुल भोईर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, बायकोच्या प्रियकराला अटक; पूर्वनियोजित कट रचत...

India vs Australia 1st T20: अर्शदीपला बाहेरचा रस्ता, हर्षितला संधी; पाहा पहिल्या टी-२० सामन्याची प्लेईंग ११

Pimpri Chinchwad : व्यायाम करताना कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT