पावसाळ्यातील आरोग्य नीट राखण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
पावसाळ्यातील आरोग्य नीट राखण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स Saam Tv
लाईफस्टाईल

पावसाळ्यातील आरोग्य नीट राखण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा आला आरोग्य सांभाळा असे कायम म्हटले जाते, सातत्याने पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढते. म्हणून पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते, विशेषतः पावसाळ्यात येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात, त्याचबरोबर पचनशक्ती मंदावलेली असल्यामुळे पोट बिघडण्याचा तक्रारी वाढतात

यामुळे पावसाळ्यात प्रतिकारक शक्ती वाढविणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत .

हे देखील पहा -

सर्वप्रथम पावसाळ्यात पाणी उकळून प्या, तसेच शीतपेयांऐवजी चहा घेण्यास प्राधान्य द्या, चहामध्ये आले म्हणजेच अद्रक व गवती चहा आवर्जून टाका, दिवसभरातून साधारण दोनदा अद्रक आणि गवतीचहा टाका कायम टाकण्याची गरज नाही. कारण गवती चहा आणि आल्याच्या अतिवापराने शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात जेवणात मसाल्याच्या पदार्थांचा वापर आवर्जून टाळा, त्याऐवजी साधा आहार घेण्यावर भर द्या जसे की साधा वरणभात, खिचडी, कमी तिखटाच्या भाज्या , आमटी वगैरे

तसेच भाकरी पचायला हलकी असल्याने पोळी ऐवजी भाकरी खाण्याला या दिवसांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे.

- पावसाळ्यात भरपूर पाणी प्या, तसेच टोमॅटो सूप सह भाज्यांचे गरम सूप घ्यायला ही हरकत नाही

Edited By - Ashwini Jadhav Kedari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Buldhana Crime: लग्नाच्या मिरवणुकीत तुफान राडा! दोन गटात दगडफेक; ३ जण जखमी

Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ८ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

Sahil Khan : अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT