Follow these tips to clean the grinder ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kitchen tips : ग्राइंडर स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

बदलत्या काळानुसार स्वयंपाकघरात काम करण्याची पद्धतही खूप बदलली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आपल्याला सर्वत्र अत्याधुनिक व गरजेच्या वस्तू पाहायला मिळतात. आजकाल जवळपास प्रत्येक घरात मिक्सर ग्राइंडरचा वापर अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. बदलत्या काळानुसार स्वयंपाकघरात काम करण्याची पद्धतही खूप बदलली आहे. पूर्वीच्या काळी मसाला किंवा स्वयंपाक घरातील इतर पदार्थ (Food) वाटण्यासाठी पाटकणाचा वापर केला जायचा परंतु, सध्या याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. एवढेच नाही तर मिक्सर अचानक बिघडला तर सर्व काम सोडून ते दुरुस्त करण्यासाठी जावे लागते. काही वेळा अगदी छोट्या चुकांमुळे मिक्सर ग्राइंडर खराब होतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची नीट साफसफाई (Clean) न करणे.

हे देखील पहा -

इलेक्ट्रॉनिक उत्पादन असल्यामुळे मिक्सर ग्राइंडर व्यवस्थित साफ करता येत नाही व्यवस्थित स्वच्छ करण्याच्या काही टिप्स पाहाणर आहोत. त्यांचा अवलंब करून तुम्ही सहज स्वच्छ करू शकता.

अशा प्रकारे मिक्सर स्वच्छ करा

१. लिंबाची साले -

लिंबू शरीरासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते इतर कामांसाठी देखील वापरले जाते. मिक्सरचा जार स्वच्छ करण्यासाठी लिंबाची साल खूप उपयुक्त आहे. लिंबाच्या सालीने भांडी बाहेरून आणि आतून चांगली घासून स्वच्छ (Water) करा. पंधरा मिनिटानंतर पाण्याने धुवा. भांडी चमकतील. यासोबतच भांड्यातून येणारा वासही जाईल. लिंबाच्या सालीचा वापर मिक्सरच्या बॉडीवरील डाग साफ करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

२. लिक्विड डिटर्जंट सोल्यूशन -

लिक्विड डिटर्जंट सोल्यूशनचा वापर ज्यूसर मिक्सर ग्राइंडर साफ करण्यासाठी आपण करु शकतो. मिक्सरच्या कंटेनरमध्ये थोडेसे पाणी आणि लिक्विड डिटर्जंटचे दोन थेंब घाला. हे मिश्रण सुमारे १० सेकंद फिरवून घ्या, त्यानंतर कंटेनर स्वच्छ पाण्याने धुवा.

३. बेकिंग पावडर -

मिक्सर ग्राइंडर बेकिंग पावडरने पूर्णपणे स्वच्छ करता येते. बेकिंग पावडर घेऊन पाण्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मिक्सरमध्ये घेऊन १५ मिनिटे तसेच राहू द्या. भांडे चांगल्या पाण्याने धुवा. यामुळे भांडी पूर्णपणे स्वच्छ होतील आणि भांड्यांचा वासही निघून जाईल.

अशाप्रकारे मिक्सर ग्राइंडर व्यवस्थित साफ करू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT