Wednesday Remedy saam tv
लाईफस्टाईल

Wednesday Remedy: करिअर आणि नोकरीत प्रगतीसाठी हे उपाय नक्की करा; गणपती बाप्पा प्रसन्न होऊन देईल आशीर्वाद

Lord Ganesha remedies for career growth: बुधवार हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी फलदायी दिवस आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होते. करिअरच्या प्रगतीसाठी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि प्रसाद म्हणून मोदक अर्पण करा.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकांचा ज्योतिष्य शास्त्रावर विश्वास असतो. यामध्ये प्रत्येक दिवस खास एका देवाला समर्पित केलेला असतो. आज बुधवार असून बुधवारी गणपती बाप्पाची पुजा केली जाते. जर तुम्हाला तुमच्या नोकरीत संघर्ष करावा लागत असेल किंवा किंवा तुमचा व्यवसाय वेग घेत नसेल? तर बुधवारी काही उपाय करून तुम्ही यश मिळवू शकता.

बुधवार विशेषतः व्यावसायिकांसाठी खूप फलदायी ठरू शकतो. हे उपाय केल्याने काम करणाऱ्या व्यावसायिकांनाही फायदा होण्याची शक्यता असते. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने यश मिळू शकते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यास मदत होते. याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळू शकणार आहे.

गणपती बाप्पााला दूर्वा चढवा

जर तुमचे करिअर स्थिर होत नसेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल, तर बुधवारी गणपती बाप्पाला चरणी शमीची पानं आणि दुर्वा अर्पण केल्याने कार्यक्षेत्रात प्रगती मिळण्यास मदत होते. बुधवारी भगवान गणेशाला मोदक अर्पण करा.

भगवान गणेशाला हिरवा रंग खूप आवडतो. त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा. गरजू व्यक्तीला हरभरा किंवा हिरवा कापड दान केल्याने करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता असते. गायीला हिरवा चारा खाऊ घालणं देखील फायद्याचं मानलं जातं. त्याचप्रमाणे बुधवारच्या दिवशी हिरवे कपडे घातल्याने बुध ग्रह मजबूत होतो.

या मंत्राचा करा जप

1. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

2. गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:।

नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक :।।

धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:।

गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT