Kitchen Hacks Saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : कडाक्याच्या थंडीत भांडी घासण्याचा वैताग येतोय ? फॉलो करा 'या' खास टिप्स

एवढ्या थंडीमध्ये थंड पाण्यामध्ये भांडी घासणे हा आपल्या प्रत्येकासाठी एक टास्क बनलेला असतो.

कोमल दामुद्रे

Kitchen Hacks : थंडीच्या दिवसात आपण सगळे भांडी घासत असतो तेव्हा असं वाटतं की कधी एकदाची भांडी घासून होतात. कारणं की एवढ्या थंडीमध्ये थंड पाण्यामध्ये भांडी घासणे हा आपल्या प्रत्येकासाठी एक टास्क बनलेला असतो.

भांडी धुणे हे जेवण बनवण्यापेक्षाही खतरनाक वाटू लागते. शंभरांपैकी एकाला तरी भांडी घासायला फार आवडत असेल. अशातच थंडीच्या दिवसांमध्ये बेसिंगमधील भांड्यांचा ढीग पाहून डोकंच फिरते. अशातच थंडीमध्ये थंड पाण्यामध्ये भांडी घासणे हे अनेकांना आवडत नाही.

परंतु भांडी घासणे हे एक असं काम आहे जे मनात नसलं तरी करावंच लागते. जर तुमच्या घरात सुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये जेवणानंतर तुमच्यावर भांडी घासायची वेळ येत असेल आणि तुम्हाला ते आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स (Tips) सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो.

1. ग्लोव्हजचा वापर करा : थंडीमध्ये थंड पाण्यापासून वाचण्यासाठी भांडी घासताना तुम्ही ग्लोव्हजचा वापर करू शकता. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्लोव्हज उपलब्ध आहेत. ग्लोव्हजचा वापर भांडी घासताना केल्यावर तुमचे हात देखील खराब होत नाही आणि तुमच्या हातात ना जास्त थंडी वाजत नाही.

2. भांड्यांचा ढीग होऊ देऊ नका : बऱ्याचदा भांडी घासताना आपण सगळी भांडी एकदाच घासतो आणि नंतर धुतो. परंतु असं केल्याने तुमच्या भांड्यांवरचा साबण सुकतो आणि भांडी धुतल्यानंतर देखील स्वच्छ निघत नाहीत त्याचबरोबर भांडी धुण्यासाठी जर तुम्हाला कोणाची मदत भेटणार नसेल तर. भांड्यांचा एका जागेवर ढीग करू नका. एक भांडे घासले की लगेच नळाखाली स्वच्छ (Clean) पाण्याने धुवून ठेवून द्या. असं केल्याने तुमची भांडी पटापट घासून होतील आणि तुमच्या भांड्यांना जास्त वेळही लागणार नाही.

Kitchen Hacks

3. गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा : भांडी धुण्याचा हा एक चांगला उपाय आहे. ज्यामुळे तुमची भांडी लवकरात लवकर साफ होतील. यासाठी तुम्हाला एका टपमध्ये गरम पाणी (Water) घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये लिक्विड डिटर्जंट टाकायच आहे. आता भांड्यांमधील उरलेले खरकटे कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्या. त्यानंतर सगळ्या भांड्यांना गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर भांड्यांना स्पंजच्या सहाय्याने साफ करा आणि पाण्याने धुवून काढा. अशा पद्धतीने भांडी भांडी घासली की तुम्हाला जास्त वेळ (Time) लागणार नाही.

4. जळालेले भांडे कसे साफ करायचे : जेवण बनवताना बऱ्याचदा भांडे जळते आणि सगळीकडे भांड्याला तशीच चिपकून राहते. जळालेल्या भांड्याला चमकवण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. मिठाच्या वापराने तुमच्या भांड्यामधील सगळी करपलेली परत निघून जाईल. यासाठी मीठ घेऊन तुमच्या भांड्याला स्क्रब करा. त्यानंतर डिश साबणाने भांडे साफ करा. मीठ हे एक क्लिनिंग एजंट असल्यामुळे तुमची भांडी पटापट स्वच्छ होतील.

भांड्यांना घासायची गरज लागणार नाही :

1. सर्वात आधी बेसिंगच्या नळीला ब्लॉक करा.

2. त्यानंतर बेसिंगमध्ये असणाऱ्या भांड्यांवरती बेकिंग सोडा टाका.

3. आता वरून दोन कप व्हिनेगर टाकून ठेवा.

4. यानंतर एक कप हायड्रोजन पेरॉक्साईड आणि एक लिंबू कापून पिळून टाका.

5. आता बेसिंग पूर्णपणे गरम पाण्याने भरून टाका.

6. जास्तीत जास्त पंधरा मिनिटे सर्व भांडी पाण्यामध्ये तशीच ठेवायची आहे.

7. त्यानंतर शेवटी भांड्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढा. तुमची भांडी पटापट चमकून निघतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT