Calorie Weight Loss Diet Plan 
लाईफस्टाईल

Weight Loss Diet Plan: वजन कमी करण्यासाठी 1200 कॅलरी डाएट प्लान करा फॉलो, आठवड्याभरात दिसेल फरक

1200 Calorie Weight Loss Diet Plan: वजन कमी करणं ही आजकाल अनेकांच्या समोर असलेली मोठी समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कॅलरी इंटेकवर अधिक भर दिला पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाला स्वतःचा फीटनेस जपायचा असतो. फीटनेस जपण्यासाठी आपण विविध प्रकारचे गोष्टी करतो. यामध्ये डाएट तसंच जीम यांचा समावेश असतो. सध्याच्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचा धोका अधिक असतो. अशावेळी वजन कमी करणं फार कठीण आहे.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कॅलरी इंटेकवर अधिक भर दिला पाहिजे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुमच्या आहारात तुमच्या कमी कॅलरी घेणं फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्ही ही गोष्ट फॉलो केलीत तर तुम्ही वजन कमी करू शकता. आम्ही तुम्हाला आज 1200 कॅलरी डाएट प्लान सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होणार आहे.

ब्रेकफास्टमध्ये काय खाणार?

सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही एक वाटी ओट्स / 2 अंड्याचं ऑम्लेट + 2 ब्राऊन ब्रेड / बेसनचा चीला + पुदिन्याची चटणी इत्यादींचा समावेश करू शकता. यामध्ये तुम्हाला ३०० कॅलरीज मिळणार आहेत.

मिड-मॉर्निंग स्नॅक्समध्ये काय खाऊ शकता?

सकाळचा नाश्ता झाल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही एखादं फळं खाऊ शकता. यामध्ये डाळिंब, सफरचंद, संत्र इत्यादी फळांचा समावेश करू शकता.

दुपारचं जेवण कसं असेल?

दुपारच्या जेवणासाठी तुम्ही 1 चपाती/ब्राऊन राइस + 1 वाटी डाळ/पनीर भाजी/चिकन + कोशिंबीर + दही घेऊ यांचा समावेश करू शकता. यामध्ये तुम्हाला अंदाजे 350 कॅलरीज मिळू शकतात.

संध्याकाळी काय खाऊ शकता?

संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुम्ही 1 कप ग्रीन टी + 1 मूठ बदाम किंवा अक्रोड खाऊ शकता. यामुळे तुम्हाला 100 कॅलरीज मिळू शकतात

रात्रीच्या जेवणात कोणच्या पदार्थांचा कराल समावेश?

यामध्ये तुम्ही 100 ग्रॅम ग्रील्ड फिश/चिकन/चीज + सॅलड 1 चपातीसोबत खाऊ शकता. हे तुम्हाला अंदाजे 350 कॅलरीज देऊ शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT