Flipkart Diwali Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Diwali Sale: दिवाळी धमाका ऑफर! Google Pixel 7a वर तब्बल १० हजारांची सूट; वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Flipkart Big Diwali Sale:

दिवाळीला काही दिवसात सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक सेल सुरू होतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळतात. फ्लिपकार्टवरही दिवाळीचा सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर ऑफर्स आहेत.

फ्लिपकार्ट दिवाळी सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये iPhone 14 ते Google Pixel अशा अनेक फोनवर डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्टचा हा सेल आजपासून सुरू होणार आहे.

तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक बँकेच्या कार्डवर डिस्काउंट मिळवू शकता. याचसोबत फक्त स्मार्टफोनच नाही तर इतर अनेक उत्पादने तुम्ही खरेदी करु शकतात. सेलमध्ये Pixel 7a या स्मार्टफोनवर खूप जास्त डिस्काउंट देण्यात आला आहे.

Google Pixel 7a ऑफर

तुम्ही फ्लिपकार्टवरुन Google Pixel 7a स्वस्तात खरेदी करु शकता. या फोनची किंमत 43,999 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्हाला या फोनवर डिस्काउंट मिळणार आहे. या फोनवर 8000 रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. हा फोन तुम्ही 35,999 रुपयांना खरेदी करु शकत. तसेच SBI कार्डवरुन फोनवर 3000 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे तुम्ही फोन 32,999 रुपयांना खरेदी करु शकतात. तसेच या फोनवर एक्सचेंज ऑफर आहे. हा फोन चार रंगामध्ये उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन

Google Pixel 7a फोनमध्ये 6.1 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Tensor G2 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 64MP+ आणि 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 4800mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT