Brain Health Saam Tv
लाईफस्टाईल

Brain Health: या चुकीच्या सवयींमुळे मेंदूवर होतोय परिणाम, वेळीच घ्या काळजी

कोमल दामुद्रे

Brain Health Tips :

मेंदू आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. यामुळे आपल्या शरीरातील सर्व कार्ये सुरळीतपणे पार पाडली जातात. त्यामुळे त्याला निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही सवयी असतात ज्यामुळे आपण कळत नकळत आपल्या मेंदूला अधिक नुकसान पोहोचवतो. त्यामुळे आपली स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि एकाग्रता यावर खूप परिणाम होतो. त्यासाठी या हानिकारक सवयींपासून मुक्त होणे फार महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया कोणत्या सवयी (Habits) मेंदूला हानी पोहोचवतात.

1. एकाच ठिकाणी बसणे

कामाच्या व्यापामुळे आपण एकाच ठिकाणी बरेचा वेळा बसून राहातो. त्यामुळे मेंदूचे रक्ताभिसरण कमी होते, ज्यामुळे मेंदूच्या पेशींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका. कामाच्या दरम्यान थोड्या थोड्या वेळाने उठा.

2. स्क्रिन टाइम

स्मार्टफोन (Smartphone), लॅपटॉप इत्यादींचा सतत वापर केल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे मेंदूला थकवा येतो आणि सर्केडियन रिदम देखील बिघडू शकते, ज्यामुळे निद्रानाशाची समस्येचा त्रास होऊ शकतो. जे मेंदूच्या आरोग्यासाठी (Health) हानिकारक आहे. त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा.

3. आहार

पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, अल्कोहोल, साखर आणि खराब चरबी मेंदूसाठी हानिकाराक असतात. या खाद्यपदार्थांमुळे अल्झायमरचा धोका वाढतो. निरोगी आहाराचा अवलंब करा. ज्यामध्ये फळे, भाज्या, कडधान्ये, पोषकत्त्व असणारे पदार्थ खा.

4. रात्री उशिरापर्यंत जागणे

सोशल मीडिया पाहताना स्क्रोल करताना लोक अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागे राहातात ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमकुवत होणे, समस्या सोडवण्यात अडचण येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यासाठी ७ ते ८ तासांची झोप घ्या.

5. पाण्याची कमतरता

पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. दररोज ८ ते ९ ग्लास पाणी प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT