Smartphone tips, How to find lost phone
Smartphone tips, How to find lost phone ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Smartphone tips : गुगलच्या 'या' नवीन फिचरचा वापर करुन हरवलेला फोन मिनिटात शोधा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मोबाईल फोनचा वापर हा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत होत असतो. संवाद साधणयापासून ते इतर अनेक गोष्टींसाठी त्याचा सहज वापर केला जातो. (How to find lost phone)

हे देखील पहा -

सध्या मोबाईल फोन हा लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनलेला आहे. सहज कुठेही त्याला हाताळता येऊ शकते. अगदी लाईच बिल भरण्यापासून ते रेल्वेचे टिकिट बुकिंग , बँकेची काम व नोकरीच्या संबंधातील इतर कामे सहज त्यावर करता येतात परंतु, आपल्याला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असणारा हा मोबाईल फोन हरवला तर अनेकदा प्रवासात आपला फोन हरवतो त्यावेळी काय कराल हे जाणून घेऊया.

आपला अँड्राइड फोन हरवल्यानंतर गुगलच्या इनबिल्ट फीचर फाइड माय डिव्हाइस (Find my device) च्या मदतीने आपल्याला शोधता येईल. हे फिचर सगळ्याच अँड्राइड फोनमध्ये दिसून येते. याचा वापर करुन आपण हरवलेल्या फोनला रिमोटली लॉक करुन त्यात असणाऱ्या आपला डेटा डिलीट करु शकतो.

अँड्राइड वापरकर्त्यांना आपला हरवलेला फोन फाइड माय डिव्हाइस या फीचरच्या मदतीने शोधण्यासाठी https://www.google.com/android/find या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय प्ले स्टोरला Find my device हे अॅप डाउनलोड करता येईल. ह्या फिचरचा वापर करण्यासाठी आपल्या फोनमध्ये ८.० हे व त्यापेक्षा पुढचे व्हर्जन असणे अधिक गरजेचे आहे. याच्या सेटिंगमध्ये जावून सिक्यूरिटी व लोकेशन या पर्यायावर क्लिक करुन Find My Device हा पर्याय ऑन करा.

फोन (Phone) हरवल्यास कोणत्याही ब्राउजरमध्ये https://www.google.com/android/find ओपन करा. आपले गुगल (Google) अकाउंट ओपन करुन लॉग इन करा. त्यात आपले फोनचे शेवटचे लोकेशन, कनेक्टिव्हिटी व बॅटरी लाईफ दिसेल. उजव्या बाजूला फोनच्या लोकशनवर टॅप करुन आपण नेव्हिगेशन सुरु करु शकतो. फाइड माय डिव्हाइसच्या मदतीने आपला डेटा लॉक करुन सुरक्षित ठेवू शकतो किंवा डिलिटही करू शकतो अशा पध्दतीने आपण आपला हरवलेला फोन शोधू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT