Fenugreek Seeds Benefits
Fenugreek Seeds Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Fenugreek Seeds Benefits : अनेक आजारांवर मेथी दाणे रामबाण, पुरुषांसाठी तर अधिकच गुणकारी !

कोमल दामुद्रे

Fenugreek Seeds Benefits : आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्याचा आपल्याला चवीसाठी तर फायदा होतोच पण त्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे आहेत. त्यातील एक मेथीचे दाणे. आयुर्वेदात मेथीच्या दाण्यांना विशेष महत्त्व आहे. चवीला अधिक कडू जरी असले तरी त्याचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात.

अनेक पदार्थांना तडका देण्यासाठी त्याचे विशेष असे महत्त्व आहे. वजन कमी (Weight loss) करण्यापासून ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. याचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया. (Latest Marathi News)

1. जळजळ कमी होते.

मेथीमध्ये फायबर, प्रोटीन, कार्ब्स, फॅट, लोह, मॅग्नेशियम आढळतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. जर संसर्ग झाल्यानंतर तुमची CRP पातळी वाढली असेल तर काही दिवस अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यासोबत घेऊ शकता.

2. पुरुषांसाठी फायदेशीर (Benefits)

टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी अनेक लोक मेथी दाण्याचे सप्लिमेंट घेतात. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, मेथीमुळे कामवासना वाढते. पूरक आहार घेण्याऐवजी नैसर्गिक उत्पादने घेणे चांगले.

3. मधुमेहात उपयुक्त

Diabetes

मेथीचे दाणे टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहामध्ये देखील फायदेशीर मानले जातात. यासाठी 50 ग्रॅम मेथीदाण्यांचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ घ्यावे. असे केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल आणि कोलेस्ट्रॉलमध्येही सुधारणा झाली.

4. इतर अनेक फायदे

मेथीचे दाणे भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करतात. ते यूरिक ऍसिडची पातळी देखील नियंत्रित करतात. याशिवाय ते पोटदुखी, बद्धकोष्ठता, सांधेदुखी आणि श्वसनाच्या आजारांवर औषध म्हणूनही काम करते.

5. केस आणि त्वचेसाठी

Skin Care

मेथीच्या बियांची पावडर केस आणि त्वचेवरही लावली जाते. असे मानले जाते की, यामुळे केसगळती कमी होते आणि केस पांढरे होत नाहीत.

असे करा मेथी दाण्याचे सेवन

तुम्ही 1-2 चमचे मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवा, सकाळी खा. जेवणापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी एक चमचा मेथी पावडर दोनदा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पाकिस्तानचा घर जाळून कोळशाचा व्यापार! सरकारी कंपन्या विकणार?

Special Report | दादा-ताई असा फरक कधीच केला नाही! पवार स्पष्टच बोलले..

Akola News: अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

SCROLL FOR NEXT