Eye Exercise Saam Tv
लाईफस्टाईल

Eye Exercise : स्क्रीन टाइमच्या वापरामुळे डोळे थकले, सतत पाणी येतेय? Office मध्ये बसल्याजागी करा ही योगासने, मिळेल आराम

Eye Exercises For Dry Eyes : स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश हा डोळ्यांवर वाईट परिणाम करतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, डोळे कोरडे पडणे किंवा डोकेदुखी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

कोमल दामुद्रे

Eye Exercise Tips :

डोळे हे आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे त्याची नियमितपणे काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक. दिवसभर लॅपटॉप आणि फोनच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.

स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश हा डोळ्यांवर वाईट परिणाम करतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, डोळे कोरडे पडणे किंवा डोकेदुखी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काही व्यायाम केल्यास डोळ्यांवरचा ताण कमी होऊ शकतो. परंतु, आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला व्यायाम करता येत नाही. अशावेळी तुम्ही ऑफिसमध्ये बसल्याजागी काही व्यायाम करु शकता. जाणून घेऊया त्याबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. २०-२०-२० नियम

२०-२०-२० च्या नियमानुसार तुमच्या डोळ्यांवरील (Eye) ताण कमी करण्यासाठी याची मदत होईल. दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा. असे केल्याने डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

2. आकृती ८

हा व्यायाम सगळ्यात सोपा आहे. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. हे करण्यासाठी तुमच्या जागेपासून १० फूट अंतरावर जमिनीवर ८ क्रमांकाची कल्पना करा. यानंतर डोळे हलवून आठ क्रमांक आठवण्याचा प्रयत्न करा. ३० सेकंद असे केल्याने डोळ्यांवरील ताण (Stress) कमी होईल.

3. फोकस बदला

डोळ्यांचा व्यायाम करण्यासाठी एकाच जागी काहीवेळासाठी फोकस करणे गरजेचे आहे. ज्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होईल. यासाठी तुम्ही फक्त तुमच्या बोटावर फोकस करु शकता. यामुळे तुमचे लक्ष देखील केंद्रित होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT