Burning Sensation While Urinating saam tv
लाईफस्टाईल

Burning Sensation While Urinating: लघवी करताना जळजळ होतेय, गंभीर आजाराचे संकेत असू शकतात का? वाचा

Causes of Burning Urination: लघवी करताना जळजळ होणे हे UTI किंवा इतर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. महिलांमध्ये हा त्रास का होतो? कोणती लक्षणे धोक्याची आहेत? डॉक्टरांनी सांगितलेली कारणं, आवश्यक तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकदा लघवी करताना जळजळ होण्याचा त्रास जाणवतो. काही जण याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात तर काहींना जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे असं होत असल्याचं वाटतं. पण लघवी करताना होणारी जळजळ खरंच सामान्य आहे का? की शरीरात एखादा आजार असल्याचं हे लक्षण असू शकतं? याबाबत FMRI गुरुग्रामच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या संचालिका आणि प्रमुख डॉ. निवेदिता कौल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय सांगितलं डॉक्टरांनी?

लघवी करताना जळजळ होण्याकडे दुर्लक्ष करू नये. हा त्रास वारंवार होत असेल किंवा एक दिवसापेक्षा जास्त काळ टिकत असेल तर त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. काही वेळा शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा तात्पुरत्या कारणांमुळे असा त्रास होऊ शकतो. पण अनेकदा हा संसर्ग किंवा इतर आरोग्याच्या समस्येचा सुरुवातीचा संकेतही असू शकतो.

लघवी करताना जळजळ होण्याची कारणं कोणती?

लघवी करताना जळजळ होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI). जेव्हा बॅक्टेरिया म्हणजेच जिवाणू लघवीच्या मार्गात प्रवेश करतात तेव्हा संसर्ग होतो. महिलांमध्ये शरीराची रचना वेगळी असल्यामुळे UTI होण्याची शक्यता अधिक असते.

याशिवाय योनीमार्गातील यीस्ट इन्फेक्शन, लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग, हार्मोन्समधील बदल आणि मेनोपॉजनंतर होणारे बदल यामुळेही लघवी करताना जळजळ होऊ शकते. काही वेळा प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्समुळेही जळजळ होण्याची शक्यता असते.

लघवीच्या जळजळीसोबत 'ही' लक्षणं दिसत असतील तर सावध व्हा

लघवी करताना जळजळ होत असेल, तर त्यासोबत आणखी कोणती लक्षणं दिसत असल्यास याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

  • वारंवार लघवीला जावं लागणं

  • अचानक लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होणं

  • पोटाच्या खालच्या भागात दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं

  • लघवीचा रंग धूसर दिसणं किंवा लघवीला दुर्गंधी येणं

ही लक्षणं UTI म्हणजेच लघवीच्या मार्गातील संसर्गाची असू शकतात

पण लघवी करताना जळजळ होण्यासोबत ताप येणं, थंडी वाजणं, पाठ दुखणं, लघवीतून रक्त येणं किंवा मळमळ होणं अशी लक्षणं दिसत असतील तर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ही लक्षणं संसर्ग किडनीपर्यंत पोहोचल्याचे संकेत असू शकतात. अशा वेळी अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्वतःहून औषधं घेऊ नका

अनेक महिला लघवी करताना जळजळ होत असल्यास स्वतःहून औषधं घेतात. काही जणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्सही घेतात. पण असं करणं टाळायला हवं. या त्रासाचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी डॉक्टर युरिन रुटीन टेस्ट आणि युरिन कल्चर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. या तपासण्यांमुळे संसर्गाचं कारण शोधण्यास आणि योग्य उपचार ठरवण्यास मदत होते.

यासोबतच दिवसभर पुरेसं पाणी पिणं आणि खासगी अवयवांची योग्य स्वच्छता राखणंही महत्त्वाचं आहे. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. लघवी करताना होणारी जळजळ ही सामान्य गोष्ट नसून शरीराकडून मिळणारा एक संकेत आहे. हा त्रास सतत होत असेल, वारंवार जाणवत असेल किंवा त्यासोबत इतर लक्षणं दिसत असतील, तर दुर्लक्ष करू नका.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवल्यास २ हजार दंड

Sunday Horoscope : रविवार ठरणार खास! कोणत्या राशींना मिळणार धनलाभ? वाचा आजचे राशिभविष्य

Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची तयारी सुरू; बेंगळुरू गाठणेही होणार सोपे

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भयंकर अपघात, कार दरीत कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

High Blood Pressure: High BPचा त्रास सतावतोय? सकाळी-सकाळी प्या फक्त हे 1 ड्रिंक; डॉक्टरांनी सांगितलं झटक्यात रक्तदाब होईल कमी

SCROLL FOR NEXT